
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' पडला? आतापर्यत फक्त...
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan Movie : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या किसी की भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाची जेवढी हवा झाली तेवढ्याच लवकर तो फुस्स झाल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच दिवसांपासून सलमानच्या नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र तो बॉक्स ऑफिसवर अपेक्षपेक्षाही कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
सलमानच्या यापूर्वीच्या अंतिम, राधे नंतर फ्लॉप होणारा त्याचा तिसरा चित्रपट ठरला आहे. आता त्याचा टायगर ३ प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे. सलमान हा नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. खरंतरं त्याच्या हटकेपणाचा प्रवास हा दबंगपासून सुरु झाला. बॉडीगार्ड, भारत, सुलतान, दबंग २, टायगर, या चित्रपटांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सलमाननं पन्नाशी केव्हाच पार केली. तो आता साठीच्या जवळ आला आहे. मात्र तरीही त्याचा स्वॅग आणि त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. याउलट तरुणाईमध्ये सलमान हा नेहमीच लाखो चाहत्यांच्या कौतूकाचा विषय राहिला आहे. त्याची हटके स्टाईल, त्याची पर्सनॅलिटी, आणि लक्ष वेधून घेणारी फॅशन यामुळे तो चर्चेत राहिला आहे. त्याची कॉपी ट्रेडिंगचा विषय राहिला आहे. अशातच त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.
सलमानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचे काय होणार असा प्रश्न साऱ्या बॉलीवूडला होता. त्या चित्रपटाचा ट्रेलरही लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर मात्र सलमान त्यामुळे ट्रोल झाला होता. या चित्रपटातील गाण्यांना प्रतिसाद मिळाला. पण त्यातील सलमानचा स्वॅग काही चाहत्यांना आवडला नाही. नेटकऱ्यांनी तर त्याला धारेवर धरले होते. यासगळ्यात त्याच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटानं निराशा केल्याचे दिसून आले आहे.
तो चित्रपट प्रदर्शित होऊन बारा दिवस झाले आहेत. फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं मंगळवार पर्यत देशभरातून १.२५ कोटींचा बिझनेस केला होता. तर सोमवारचे कलेक्शन २.२५ कोटी होते. बारा दिवस होऊन गेले तरी या चित्रपटानं अजुन शंभर कोटींची कमाई केलेली नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आतापर्यत या चित्रपटानं ९८.५० कोटींची कमाई केलेली आहे.
यासगळ्यात अडचणीची बाब अशी की शुक्रवारी गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी ३ प्रदर्शित होणार असून त्याचा परिणाम सलमानच्या किसी का भाई किसी की जानवर होणार असल्याचे बोलले जात आहे.