आगळी-वेगळी लग्नपत्रिका 

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

"गेम ऑफ थ्रोन्स'फेम किट हॅरिंग्टन आणि रोझ लेसली यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल गेली दोन वर्षे चर्चा सुरू आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही समजते. यांच्या लग्नाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. पण एका स्कॉटिश कॅसेलमध्ये यांचे लग्न होणार आहे. या स्कॉटिश पॅलेसचे नावही अजून जाहीर करण्यात आलेले नाही. यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका जेव्हा त्यांच्या नातेवाईक आणि इतर लोकांना मिळाली, तेव्हा त्यावर किटचा चेहरा पाहून सगळे लोक अवाक्‌ झाले. युकेमधील रॉयल मेल कंपनीने "गेम ऑफ थ्रोन्स'च्या स्टॅम्प (तिकिटे)ची सीरिज सुरू केली होती. त्यामुळे यामध्ये जॉन स्नो चाही स्टॅम्प होता.

"गेम ऑफ थ्रोन्स'फेम किट हॅरिंग्टन आणि रोझ लेसली यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल गेली दोन वर्षे चर्चा सुरू आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही समजते. यांच्या लग्नाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. पण एका स्कॉटिश कॅसेलमध्ये यांचे लग्न होणार आहे. या स्कॉटिश पॅलेसचे नावही अजून जाहीर करण्यात आलेले नाही. यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका जेव्हा त्यांच्या नातेवाईक आणि इतर लोकांना मिळाली, तेव्हा त्यावर किटचा चेहरा पाहून सगळे लोक अवाक्‌ झाले. युकेमधील रॉयल मेल कंपनीने "गेम ऑफ थ्रोन्स'च्या स्टॅम्प (तिकिटे)ची सीरिज सुरू केली होती. त्यामुळे यामध्ये जॉन स्नो चाही स्टॅम्प होता. मग किट आणि रोझच्या लग्नपत्रिकेसाठीही या कंपनीने हे स्टॅम्प्सच वापरले. किट हॅरिंग्टनने "गेम ऑफ थ्रोन्म'मध्ये जॉन स्नो नावाची भूमिका केली होती; तर रोझने त्याच्या प्रेयसीची- यिग्रीटची भूमिका केली होती. रोझचा चौथ्या सीझमध्ये मृत्यू झालेला दाखवला होता. आता किट "गेम ऑफ थ्रोन्स'च्या 2019 मध्ये येणाऱ्या आठव्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा या मालिकेचा शेवटचा सीझन असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kit harington and rose leslie wedding invitation

टॅग्स