किथचा "खुबसूरत' लूक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

तुम्ही फवाद खानच्या "खुबसूरत' मधील लूकवर फिदा झाला होता ना? तो फवाद खान सगळ्या मुलींच्या दिल की धडकन बनला होता. आता त्याचा तोच लूक परत येतोय. पण या वेळी तो फवाद खानने केला नाहीये; तर किथ सिक्वेराने केला आहे.

स्टार प्लसवरच्या आगामी मालिकेत त्याने फवादचा "खुबसूरत' या चित्रपटातील लूक घेतला आहे. ही मालिका आहे "लव का है इंतजार'. या मालिकेत तो एका राजकुमाराची भूमिका करतोय. हा राजकुमार साधा सरळ आणि प्रगतिशील विचारांचा आहे. त्याला कलेची आवड आहे. त्यामुळे या राजकुमाराचा लूक "खुबसूरत' मधील राजकुमार विक्रमसिंग राठोडसारखाच आहे.

नेहरू जॅकेट आणि सूट असा त्याचा लूक असणार आहे. "लव का है इंतजार' ही मालिका राजकुमार माधव (किथ सिक्वेरा) आणि सुपरस्टार कामिनी (संजिदा शेख) यांच्यामधील एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येतेय. किथ याबद्दल खूपच उत्सुक आहे. तो म्हणतो, "माझा या मालिकेतील लूक खूपच मस्त आहे. मी वेगवेगळ्या पेस्टल कलर्समधले नेहरू जॅकेट आणि स्लिम फीट ट्राऊझर घालताना दिसणार आहे. माझी भूमिका आजच्या मुलांसारखी आहे. ज्याच्यामध्ये शाही अदब आहे. त्याप्रमाणे माझी वेषभूषा करण्यात आलीय.'

Web Title: kith square love ka intjar