शाहरुखला भेटलेली ही गायिका आहे तरी कोण ?

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

शाहरुखसोबत दिसणाऱ्या या गायिकेची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या ही गायिका आहे तरी कोण ?

मुंबई : इंटरनेटवर सध्या शाहरुख सोबतच्या एका विदेशी गायिकेचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. इंटरनेटवर सध्या तिचाच बोलबाला आहे आणि नेटकऱ्यांमध्येही तिची चर्चा पाहायला मिळतेय. हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका केटी पेरी सध्या भारत दौऱ्यावर आहे. जगातील सर्वात लोकप्रिय़ गायिकांपैकी ती एक आहे. ती बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींसोबत करण जोहरच्या पार्टीमध्ये दिसली. तिच्यामागोमाग आता शाहरुखसोबत दिसणाऱ्या या गायिकेची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या ही गायिका आहे तरी कोण ?

शाहरुख खानसोबत दिसलेली ही सुप्रसिद्ध गायिका आहे दुआ लीपा. ती इंग्लंडची पॉपस्टार आहे. दुआ सध्या भारत दौऱ्यावर आहे आणि मुंबईत आल्यावर तीने बॉलिवूडच्या किंग खानची भेट घेतली. शाहरुखने दुआसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिचं भारतात आल्याबद्दल स्वागत केलं आहे. दुआ लीपा खरंतर आज मुंबईत पार पडणाऱ्या 'वन प्लस म्युजिक कॉन्सर्ट' साठी भारतात आली आहे. या कॉन्सर्टसाठी ती स्वत: परफॉर्मही करणार आहे.

कोण आहे दुआ लीपा ?
दुआ ही लंडनमधील इंग्लिश गायिका आणि संगीत लेखक आहे. त्याशिवाय दुआ मॉडेलही आहे. वयाच्या 14 व्या वर्षी तिनं गायन क्षेत्रात पर्दापण केलं. त्यानंतर 2015 मध्ये 'Warner Music Group' या मोठ्या कंपनीने तिला ऑफर दिली आणि तिचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला. आतापर्यंत तिला अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

दुआ लंडनमध्येच जन्मली. तिचे पालक अल्बानियन आहेत. दुआ तिचे वडिल दुकाग्जिन लीपा यांची गाणी ऐकतच मोठी झाली. अल्बानियनमध्ये दुआचा अर्थ 'प्रेम' असा होतो. वयाच्या 14 व्या वर्षापासून दुआने तिच्या आवडीच्या गायकांची गाणी स्वत: च्या आवाजात रेकॉर्ड करुन युट्युबर अपलोड करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात तिने मॉडलिंग सुरु केलं. 2013 मध्ये 'The X Factor' च्या टेल्हिव्हिजन अॅडमध्ये ती झळकली. Warner Music Group सोबत काम सुरु केल्यावर 2015 मध्ये तिनं 'New love' हा पहिला अल्बम लॉन्च केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

cute but lethal. I’ve gone through four pairs of tights with this dress. 

A post shared by Dua Lipa (@dualipa) on

न्यु रुल्स, नो लाय, लॉस्ट इन युअर लाईट, बी द वन, माय लव्ह ही काही तिची सुपरहिट गाणी आहेत. मी माझ्या गाण्याचा आणि प्लॅटफॉर्मचा वापर युवा पिढीला लैंगिक समानतेविषयी जागरुक करण्यासाठी आणि त्यांना महत्त्व समजवण्यासाठी करायचा आहे. पुरुष आणि महिला या दोघांचा समान आदर करणे गरजेचे आहे. आता जगामध्ये विचित्र काळ सुरु आहे आणि येत्या काळात महिलाच या जगावर राज्य करतील. असं मत एका मुलाखतीमध्ये दुआने व्यक्त केलं होतं. 

शाहरुख दुआला म्हणाला...

शाहरुखने दुआसोबत शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे,' (new rules)नव्या नियमांपासून जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुआपेक्षा ते अधिक चांगलं कोण जाणू शकतं. जिकती प्रेमळ आणि सुंदर ती आहे तितकाच चांगला तिचा आवाज आहे. आज रात्री होणाऱ्य़ा कॉन्सर्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. दुआ, मी शिकवलेल्या डान्स स्टेप स्टेजवर नक्की कर'. New Rules हा दुआचा गाण्याचा अल्बम आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know about this pop singer who met with shahrukh khan