'छपाक' गर्ल लक्ष्मी अग्रवाल आहे तरी कोण ?

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

दीपिका पदुकोऩचा आगामी सिनेमा 'छपाक' ची चर्चा सध्या सगळीकडेच सुरु आहे. ट्रेलर पाहताना मालतीच्या किंकाळ्या ऐकुन अंगावर शहारा येतो. पण, त्या भयानक ऍसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता म्हणजे लक्ष्मी अग्रवाल. 

मुंबई : दीपिका पदुकोऩचा आगामी सिनेमा 'छपाक' ची चर्चा सध्या सगळीकडेच सुरु आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये याच चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. ट्रेलर पाहताना मालतीच्या किंकाळ्या ऐकुन अंगावर शहारा येतो. पण, त्या भयानक ऍसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता म्हणजे लक्ष्मी अग्रवाल. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

लक्ष्मीचा जन्म दिल्लीमधला. मध्यमवर्गीय घरातील लक्ष्मीची सामान्य मुलीसारखीच स्वप्न होती. वयाच्या 15 व्या वर्षीच तिनं गायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण त्याचवेळी लक्ष्मीसोबत भयानक प्रसंग घडला ज्याने तिचं सारं आयुष्यचं पालटलं.

नदीम खान नावाचा 32 वर्षांचा मुलगा लक्ष्मीला पसंत करत होता. त्याला लक्ष्मीसोबत लग्न करायचं होत. पण, लक्ष्मीला हे नातं अजिबात मान्य नव्हतं. लक्ष्मीला आपलं करण्यासाठी नदीम तिचा पाठलाग करत असे. या सर्व प्रकाराला लक्ष्मीने विरोध केला. नदीमला अनेकदा नकारही दिला तरी मात्र नदीमने काही तिचा पिच्छा सोड़ला नाही. त्यानंतरच लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला !

हे सर्व साधारण वाटत असलं तरी य़ाच प्रकाराचं एका भयानक प्रसंगामध्ये रुपांतर झालं. साल 2005 मध्ये लक्ष्मीवर 'तो' भयानक हल्ला झाला. त्यावेळी लक्ष्मी दिल्लीच्या खान मार्केटमध्ये एक पुस्तक खरेदी करायला गेली होती. त्याचवेळी त्याठिकाणी नदीमने लक्ष्मीवर ऍसिड फेकले. लक्ष्मी कोसळुन पडली आणि वेदनांमध्ये तडफत राहिली. 

 

Image may contain: 4 people, people smiling, text

एक टॅक्सी चालक तिथे गेला आणि त्याने तिला जवळच्या सफदरजंग दवाखान्यात दाखल केले. एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीनी तिची वेदनादायक कहाणी आणि तो प्रसंग सांगितला होता. त्यावेळी ती म्हणाली,' जेव्हा त्याने ऍसिड टाकलं तेव्हा वाटलं की शरीरालाच कोणीतरी आग लावली आहे. माझी त्वचा निघाली होती. माझी त्वचा वेगळी होऊन राख होत होती. 

या हल्ल्यानंतर लक्ष्मीला सर्जरी करावी लागली होती. जवळपास तीन महिने ती दवाखान्यात होती. लक्ष्मी सांगते,'ज्या वॉर्डमध्ये मी होते तिथे एकही आरसा लावला नव्हता. रोज सकाळी नर्स चेहरा साफ करायला मला पाणी आणून द्यायची. त्या पाण्यात मी स्वत:चा चेहरा बघण्याचा प्रयत्न करायचे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I love sareeeeeeee 

A post shared by Laxmi Agarwal (@thelaxmiagarwal) on

साल 2006 मध्ये लक्ष्मीने ऍसिड बॅन करण्याची मागणी सुप्रिम कोर्टाकडे केली. त्याचवेळी लक्ष्मी 'Stop Acid Attacks' या कॅंपेनमध्ये सहभागी झाली. हे काम करत असताना लक्ष्मी इतर ऍसिड हल्ला पीडितांचा आवाज बनली आणि त्यांच्यासाठी काम करु लागली. या कॅपेनला आलोक दीक्षित आणि आशीष शुक्ला हे चालवत होते. अमिरेकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्याहस्ते लक्ष्मीला 'आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार' मिळाला. 

Image may contain: 2 people, people smiling, beard

कॅंपेनच्या दरम्यान लक्ष्मी आणि आलोक यांचे प्रेम जुळले. त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला पिहू नावाची मुलगी झाली. पण, पिहूच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात वादविवाद होऊ लागले. अखेर ते दोघं वेगळे झाले आणि लक्ष्मी पिहूचा सांभाळ करु लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

mother daughter  #mylovemylife @pihu_she

A post shared by Laxmi Agarwal (@thelaxmiagarwal) on

लक्ष्मीच्या जीवनावर आधारीत 'छपाक' हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात लक्ष्मीची भूमिका दीपिकाने साकारली आहे. मेघना गुलजार या 'छपाक'चे दिग्दर्शन करत आहे. तर, दीपिका पदुकोन, फॉक्स स्टार स्टुडिओज, गोविंद सिंग संधू यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार आणि अतिका चौहान यांनी कथा लिहिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know more about acid attack survivor laxmi agarwal