अभिनेत्री म्हणतेय, बॉयफ्रेंड मला बाथरूममध्ये बंद करायचा अन्...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्री कोयना मित्राने आपल्या जुन्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या शो दरम्यान, तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

मुंबई  : बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्री कोयना मित्राने आपल्या जुन्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या शो दरम्यान, तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#koenamitra #Indianmodel #actress #bollywood

A post shared by Team Koena Mitra (@koenaofficial) on

कोयना यावेळी म्हणाली की, तिला तिचा बॉयफ्रेंड अनेक प्रकारे त्रास द्यायचा. कोयनाला बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि दलजीत कौर यांच्या बरोबर आपल्या बॉयफ्रेंडबद्दल गप्पा करताना पाहण्यात आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bollywood Actress #koenamitra #actress #bollywood #bengali #delhi #mumbaimodel #mumbai

A post shared by Team Koena Mitra (@koenaofficial) on

यावेळी झालेल्या गप्पांदरम्यान कोयनाने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड तिला भारत सोडून टर्कीमध्ये राहण्यासाठी धमकावत असे. तिने आपल्या बॉयफ्रेंडचा उल्लेख टाळून सांगितले की, तो एकदा तिच्या घरी आला असता त्याने तिला बाधरूममध्ये कोंडून ठेवले होते. जवळजवळ 3 तासांनंतर ती एका कर्मचाऱ्याच्या मदतीने बाथरूममधून बाहेर आली.

या घटनेनंतर कोयना खूप घाबरली, यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडशी असलेले नाते तोडून टाकले. यानंतर पुढे तिने सांगितले की, या घटनेनंतर तिने जवळजवळ तीन वर्षे कोणालाही डेट केले नाही. कोयनाला खरी लोकप्रियता मुसाफिर या चित्रपटातील 'साकी साकी' यामधील डान्समुळे मिळाली होती.

दरम्यान, त्यानंतर ती बरेच दिवस बॉलिवूडपासून दूर झाली  होती.   मुसाफिर (2004), इंसान (2005), एक खिलाड़ी एक हसीना (2005), अपना सपना मनी मनी (2006) आणि अनामिका- द अनटोल्ड स्टोरी (2008) अशा बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koena opens up on possessive ex lover