आमिरने ओढला पाईप.. ‘कॉफी विथ करण’च्या सेटवरून आमीर- करीनाचे फोटो लीक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan 7: Kareena Kapoor and Aamir Khan shoot with Karan Johar

आमीरने ओढला पाईप.. ‘कॉफी विथ करण’च्या सेटवरून आमीर- करीनाचे फोटो लीक

koffee with karan : 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीजनला दणक्यात सुरुवात झाली आहे. आलिया, रणवीर, सारा, विजय देवरकोंडा आणि अनेक कलाकारांची गुपिते आता समोर येऊ लागल्याने शो चांगलाच हीट ठरत आहेत. त्यात करण जोहर आपल्या हटके स्टाइलने कलाकारांच्या आयुष्यातील गुपिते जाणून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. लवकरच या शो मध्ये बॉलीवुड अभिनेता आमीर खान (aamir khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor ) दिसणार आहेत. या दोघांचे 'कॉफी विथ करण'च्या सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांचीही उत्कंठा वाढली आहे.

(Koffee With Karan 7: Kareena Kapoor and Aamir Khan shoot with Karan Johar)

आमीर खान आणि करीना कपूर सध्या त्यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच ते ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये दिसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कारण आमिर खान आणि करीना कपूरचे सेटवरील फोटोह लीक झाले असून सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत.

'कॉफी विथ करण'च्या ट्रेलरमध्ये दोघेही दिसले नव्हते. पण आता सेटवरील फोटो पाहून आमीर आणि करीना कधी दिसणार याची प्रेक्षक वाट बघत आहेत. यापूर्वी करीना कपूर खानने तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ‘मला माझी ब्लॅक कॉफी आवडते’, असं लिहून तिने या शोमध्ये दिसणार असल्याचा इशाराही दिला होता. लिक झालेल्या फोटोंमध्ये आमीर खान पाइप ओढताना दिसत आहे तर करीना करण जोहरशी गप्पागोष्टी करत आहे.

Web Title: Koffee With Karan 7 Kareena Kapoor And Aamir Khan Shoot With Karan Johar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..