Karan Johar: 'विमानात जे झालं त्याची अजुनही वाटते लाज'! काय बोलून बसला करण |Koffee with Karan karan johar share airplane bold incident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan johar news

Karan Johar: 'विमानात जे झालं त्याची अजुनही वाटते लाज'! काय बोलून बसला करण

KWK: करण जोहरविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईलनं नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या करणचा चाहतावर्ग मोठा (Bollywood News) आहे. बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वात मोठा निर्माता म्हणून करण जोहरचे नाव घ्यावे लागेल. त्याच्या चित्रपटांना मिळणारा चाहतावर्ग (Viral Karan Johar News) प्रचंड आहे. करणचा कॉफी विथ करण नावाचा शो हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्यामध्ये जे सेलिब्रेटी येतात त्यांना करण (entertainment news) भन्नाट प्रश्न विचारुन बोलते करुन त्यांची विकेट घेतो. पण बऱ्याचदा यासगळ्यात करणचीही विकेट जाते. असचं काहीसं आता दिसून आलं आहे.

कॉफी विथ करण हा शो आता मनोरंजन विश्वामध्ये भलताच लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या शोमध्ये सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असलेली चर्चा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अशातच करण जोहरच्या त्या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ हा देखील सहभागी झाला होता. करणनं टायगर श्रॉफला प्लेनमधील सेक्स यावर एक प्रश्न विचारला होता. मात्र त्यावर करणनं त्याची एक आठवण सांगून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात करणनं आपल्यासोबत विमान प्रवासात जे घडलं ते भलतंच भयानक होतं असं म्हटलं आहे. ती वेळ माझ्यासाठी भलतीच कठीण होती. असं करणनं सांगितलं आहे.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

करण जोहरनं रॅपिड फायर राऊंड दरम्यान टायगरला एक प्रश्न केला होता. तो असा की, तुला वेगवेगळ्या ठिकाणी रिलेशनशिप ठेवायला आवडते का, त्यावर टायगर म्हणाला मला त्यात काही गैर वाटत नाही. मात्र उंच हवेत अशाप्रकारचं काही करणं हे रिस्की असतं असं मला वाटतं. त्यावर करणनं त्याला आपली एक वेगळी आठवण सांगितली आहे. करण म्हणतो, माईल हाई क्लब नावाचा एक ग्रुप आहे. जो एअरक्राफ्टमध्ये सेक्स करणाऱ्यांचा ग्रुप म्हणून ओळखला जातो. माझी त्याबद्दल एक आठवण आहे. ते आठवल्यावर मला अजुनही लाजल्यासारखं होतं. मी जेव्हा प्लेनमध्ये त्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मला एकानं पकडलं होतं.

हेही वाचा: ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय?

माझ्यासाठी तो प्रसंग खूपच वेगळा होता. तो अजुनही मला वेगळ्याच ट्रान्समध्ये घेऊन जातो. हे असं पहिल्यांदाच माझ्यासोबत झालं असं नाही. यापूर्वी कभी खुशी कभी गमच्या वेळेस सुरज हुआ मद्दम गाण्याचे शुट सुरु होते. माझे पोट खराब झाले होते. सेटवर कुठेही टॉयलेट नव्हते. अशावेळी मला ज्या गोष्टीला सामोरं जावं लागलं ते भयानक होतं. मला शोधण्यासाठी संपूर्ण क्रु आला होता. मी माझ्यासोबत जे झालं होतं ते कुणालाही न सांगण्याची विनंती केली होती.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Web Title: Koffee With Karan Karan Johar Share Airplane Bold Incident In Front Of Tiger Shroff Viral Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..