प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते केविन डॉब्सन यांचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

अमेरिकेचे प्रसिद्ध अभिनेते केविन डॉब्सिनचं निधन झालं. त्यांना अमेरिकेचा चर्चित टीव्ही शो 'कोजाक' आणि 'नोट्स लँडिग'मधील जबरदस्त अभिनयासाठी ओळखलं जातं.

मुंबई- अमेरिकेचे प्रसिद्ध अभिनेते केविन डॉब्सिनचं निधन झालं. त्यांना अमेरिकेचा चर्चित टीव्ही शो 'कोजाक' आणि 'नोट्स लँडिग'मधील जबरदस्त अभिनयासाठी ओळखलं जातं. केविन डॉब्सन यांनी सोमवारी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी 'युनायटेड वेटरन्स काऊंसिल ऑफ सैन जोकिन काउंटी'ने त्यांच्या सोशल मिडियावरुन दिली आहे. केविन डॉब्सन, सैन जोकिन काऊंटीचे चेअरमन देखील होते. 

हे ही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी मनोवैज्ञानिक सूसन वॉकरविरोधात दाखल केली तक्रार  

सोशल मिडियावर केविन डॉब्सन यांच्या निधनावर चाहते शोक व्यक्त करत आहेत. सोबतंच अमेरिकी सिनेमातील त्यांच्या खास योगदानासाठी त्यांच्या आठवणीत दुःख व्यक्त करत आहेत. केविन डॉब्सन यांचा जन्म १८ मार्च १९४३ साली न्युयॉर्कमधील क्वीन येथे झाला होता. डॉब्सन एक बहादूर आणि लांग आयलँड रेलमार्गचे कंडक्टर देखील होते. कलाकार म्हणून त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात १९६८ मध्ये अमेरिकी टीव्ही शो 'वन लाईफ टू लीव्ह' पासून केली होती. या कार्यक्रमात त्यांच्या पात्राचं नाव गवर्नर हैरिसन ब्रुक होतं. या शोनंतर केविन डॉब्सन अमेरिकेच्या 'डॉक्टर्स', 'कोजाक' आणि 'द ग्रेटेस्ट हिरो ऑफ द बायबल' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसून आले.

Kojak Star Kevin Dobson Has Died | CBR

त्यांनी हॉलीवूडच्या अनेक चांगल्या सिनेमांतील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. केविन यांनी 'मिडवे', 'ऑल नाईट लांग' आणि 'डार्क पॉवर' सारख्या अनेक हॉलीवूड सिनेमांमध्ये काम केलं. डॉब्सन यांना हॉलीवूडच्या सेलिब्रिटींसोबतंच चाहते देखील श्रद्धांजली देत आहेत.    

kojak and knots landing star kevin dobson passes away at the age of 77  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kojak and knots landing star kevin dobson passes away at the age of 77