Kolhapur State Drama Competition :
Kolhapur State Drama Competition :

‘पैलतीरचा एक प्रामाणिक प्रयोग

काेल्हापूर : बेळगावच्या भगतसिंग युवक मंडळाने बुधवारी स्पर्धेत पराग घोंगे लिखित ‘पैलतीर’ या नाटकाचा प्रयोग अगदी प्रामाणिकपणे सादर केला. नदीच्या दोन किनाऱ्यांचे मिलन कधीच होत नाही. पण, त्याचवेळी मधून वाहणारी नदी ही संपूर्ण जगाची तहान भागवत असते. तेव्हा पैलतीराची तहान कशी व कोण भागवेल, असा विचार कधी ती करते? याच कथासूत्रावर बेतलेला हा प्रयोग यंदाच्या स्पर्धेत पुन्हा अनुभवता आला.

पुरुष व स्त्री त्यातही ती समवयस्क आणि एकत्र दिसली, की आजही अनेक अंगांनी वारेमाप चर्चा सुरू होते. त्यांच्यातील नात्याकडे सकस दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आजही फारसा होत नाही. त्यातही दोन पिढ्यांतील विचारांचे अंतर हा तर सतत चर्चेत येणारा चर्चेचा विषय.

स्त्री-पुरुष संबंधांधावरील  भाष्य

अशाच गोष्टींवर बोलताना एका कौटुंबिक कथासूत्रातून पराग घोंगे यांनी वर्तमानातील स्त्री-पुरुष संबंधांतील मानसिकतेवर सर्वांगाने भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ‘भगतसिंग’च्या टीमनं तो तितक्‍याच दमदारपणे रसिकांसमोर मांडला.

हेही वाचा - लग्नाला झाले अवघे तीनच महिने अन्‌ तो तिला म्हणाला...

भगतसिंग’ टीमचे  काम काैतुकास्पद

दोन वर्षापूर्वी बेळगावच्याच सरस्वती वाचनालयाच्या टीमनं हे नाटक येथील केंद्रावर सादर केले होते. मात्र, ‘भगतसिंग’च्या टीमनं हा प्रयोग पुन्हा स्पर्धेत आणताना तो अधिक सफाईदारपणे सादर करण्याचा प्रयत्न केला.

पराग घोंगेच्या नाटकाची बक्षिसांची लयलूट

पराग घोंगे हे विदर्भातील प्रसिद्ध लेखक असून ‘अंधारकैद’ सारखी एकांकिका असो किंवा ‘वाळूचं घर’, या त्यांच्या नाटकानं राज्य नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसांची लयलूट केली. त्यांची अनेक पुस्तकेही वाचकप्रिय आहेत

पात्र परिचय
 सुधीर शेटे (रोहित), प्रिया काळे (मेघना), ऋषीकेश पिसे (परिमल), स्नेहा साळुंखे (मीनल), सायली शेंडे (मीनल), राघव हुद्दार, मारूती गाडीवडर, श्रीपाद कुडतरकर, तन्वी गावडे, सुदर्शन साळुंखे, आयुष बाचीकर, वैष्णवी रामनींग, रोहित सोमसाळे, शीतल भुईंबर (इतर).

दिग्दर्शक- अक्षय गोडसे
 संगीत- प्रणाम राणे
 प्रकाशयोजना- प्रशांत नावगेकर
 रंगभूषा- स्वप्नील नावगेकर
 वेशभूषा- शर्मिला भडभडे
 नेपथ्य- पार्थ तमुचे
 रंगमंच व्यवस्था- सुनील काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com