Kon Honar Crorepati: मनासारख जगायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते.. ३ दिवसात सुरू होतोय २ कोटीचा खेळ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kon honaar crorepati new season starts form 29 may on sony marathi these season final winning amount 2 crore

Kon Honar Crorepati: मनासारख जगायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते.. ३ दिवसात सुरू होतोय २ कोटीचा खेळ..

Kon Honar Crorepati: ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती.

सोनी मराठी वाहिनीवर 29 मे पासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे आहे. या कार्यक्रमात यंदा बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे.

पण, या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्ट देखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे.

(kon honaar crorepati new season starts form 29 may on sony marathi these season final winning amount 2 crore)

खरं तर 'कोण होणार करोडपती' च्या हॉटसीट वर बसून करोडपती होण्याचे अनेकांचं स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या शो मध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळते.

सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे नाही राहायचं असं सांगत 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी आता एक नाही तर तब्बल 2 करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे.

हो, हे खरंय म्हणजेच 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. प्रश्नोत्तराच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

तर आता मागे नाही राहायचं असं ब्रीददवाक्य घेऊन येत आहे 'कोण होणार करोडपती'चा येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याच स्वप्न 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाने सामान्य टीव्ही प्रेक्षकांना दाखवलं, अन् अल्पावधीतच हा शो तूफान लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील उत्कंठावर्धक प्रश्नांच्या खेळाने कित्येक सामान्य माणसाचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवल.

अन् आता पुन्हा एकदा हा मंच स्पर्धकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज झाला आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यपणे कार्यक्रमाच्या प्रसारणाला सुरुवात होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन सुरू होते. मात्र यंदा ज्या इच्छुक स्पर्धकांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा संधी मिळालेली नाही अशा स्पर्धकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासाठी काय करावे लागणार ? हे जाणून घेण्यासाठी 'कोण होणार करोडपती' चा 29 मे रोजीचा पहिला भाग पाहावा लागेल.