10 वर्ष संसार करून बॉलीवुडची 'ही' जोडी घेतेय घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

बॉलीवुड सेलिब्रिटी कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दखल केलाय..ही जोडी 5 वर्षांपासून वेगळी राहतेय.

बॉलीवुड सेलिब्रिटी कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दखल केलाय..ही जोडी 5 वर्षांपासून वेगळी राहतेय..गेल्या वर्षी तितली सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रणवीर शौरीने आपण कोंकणा पासून वेगळे होत असल्याची कबूली दिली होती...मात्र या दोघांचे चाहते या बातमीमुळे प्रचंड नाराज आहेत..

Image result for ranveer konkana divorce

एका वेबसाईटला दिलेल्या महितीनुसार रणवीरने माध्यमांसमोर हे स्पष्ट केलंय की मी आणि कोंकणा आता कोणत्याही नात्यात नाही आहोत..कोंकणापासून वेगळं होण्याला मी कारणीभूत आहे..दोघांनीही एकमताने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय..सोबतच घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे..

हे ही वाचा :आदीत्यने वडिल मुख्यमंत्री झाल्यावर छंद पूर्ण केले नाहीत ; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

तसं पाहायला गेल तर दोहे 5 वर्षापासुनच वेगळे राहत होते मात्र आता कोर्टाच्या आदेशानंतर ते ऑफिशियली वेगळे होतील..जेव्हा कोंकणा आणि रणवीरने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता तेव्हा त्यांचं समुपदेशन देखील झालं होतं...मात्र शेवटी त्यांनी वेगळं होणंच पसंत केलं..दोघांना 6 वर्षाचा मुलगा आहे..दोघांनी मुलाच्या कस्टडीसाठी जॉइंट कस्टडीचा पर्याय निवडलाय...दोघेही आधीपासुनच एकत्र मुलाचा सांभाळ करतात..

Image result for ranveer konkana divorce

कोंकणा आणि रणवीर यांनी 2010 मध्ये लग्न केलं होतं..या दोघांनी ट्रैफिक सिग्नल, मिक्सड डबल्स, आजा नचले सारख्या सिनेमात एकत्र काम केलंय..लग्नाआधीच कोंकणा गरोदर राहीली होती...त्यांचं अफेयर, प्रेग्नन्सी, लग्न या गोष्टीमुळे दोघेही चर्चेत राहिले होते..या जोडीचं असं वेगळं होणं त्यांच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमीच म्हणावी लागेल...

konkana sen sharma and ranveer shauri filed divorce after living 10 years together


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkana sen sharma and ranveer shauri filed divorce after living 10 years together