कृष्णा भट्टचे दिग्दर्शनात पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पहिला सीझन विक्रम भट्ट यांच्या ‘व्ही बी ऑन वेब’ या वेबसाईटवर प्रक्षेपित झाला होता. आता याचा दुसरा सीझनही याच वेबसाईटवर दिसणार आहे.

विक्रम भट्ट यांच्या ‘माया’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन ‘माया- २’ नुकताच सुरू झाला आहे. या वेबसीरिजमधून विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

 maaya 2 web series

पहिला सीझन विक्रम भट्ट यांच्या ‘व्ही बी ऑन वेब’ या वेबसाईटवर प्रक्षेपित झाला होता. आता याचा दुसरा सीझनही याच वेबसाईटवर दिसणार आहे. ‘माया- २’ ही वेबसीरिज दोन समलैंगिक महिलांच्या जीवनाभोवती फिरणारी आहे. आणि ही कथा स्वतः विक्रम भट्ट यांनी लिहिलेली आहे. याबद्दल बोलताना विक्रम भट्ट म्हणाले, ‘मी समलैंगिक संबंधांवर विचार करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की सर्वसामान्य माणसांसारख्या या लोकांच्याही काही इच्छा-आकांक्षा असतील. देवाने त्यांना असे बनवले आहे. त्यामुळे प्रकृतीच्या नियमांमध्ये आपण ढवळाढवळ न केलेलीच बरी.’ माया- २ मध्ये प्रियल गौर आणि लीना जुमानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत; तर कृष्णाने त्यांना पडद्यावर मांडण्याचे काम केले आहे.  

Web Title: krishna bhatt debut in direction for maya 2 webseries