‘बच्चन पांडे’मध्ये क्रिती? 

‘बच्चन पांडे’मध्ये क्रिती? 

नवा दिल्ली : अभिनेत्री क्रिती सेननचे बॉलीवूडमध्ये एन्ट्री करताच ‘लुका छुपी’, ‘बरेली की बर्फी’सारखे चित्रपट चांगलेच गाजले. नुकताच तिचा ‘हाऊसफुल ४’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता लवकरच ती अजून एका चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटासाठी क्रितीच्या नावाची चर्चा आहे. ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अक्षयसोबत कोणती अभिनेत्री झळकणार यावर चर्चा सुरूच होती. अक्षयसोबत हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला करणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com