क्रिती सॅननने बनवलेलं पूडींग पाहून कार्तिकने उडवली खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

अभिनेत्री क्रिती सॅननने लॉकडाऊन मध्ये तिचा वेळ घालवण्यासाठी नवीन प्रयोग करुन पाहिला आहे..या वेळात ती सध्या जेवणात कुशल बनण्याचा प्रयत्न करतेय..क्रितीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई- कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे..घरात राहुन काय करावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे..नेहमी कामात व्यस्त असणारे सेलिब्रिटीही घरात या ना त्या प्रकारे वेळ घालवत आहेत..अभिनेत्री क्रिती सॅननने देखील लॉकडाऊन मध्ये तिचा वेळ घालवण्यासाठी नवीन प्रयोग करुन पाहिला आहे..या वेळात ती सध्या जेवणात कुशल बनण्याचा प्रयत्न करतेय..क्रितीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

हे ही वाचा: हृतिक रोशनवर का आली छोट्या दोस्तांना आवाहन करण्याची वेळ?

या फोटोमध्ये ती चिया पुडिंग बनवताना दिसत आहे..या फोटोला कॅप्शन देताना तीने लिहिलंय,'हॅशटॅग क्रिटिकल कुकिंग' इतकंच नाही तर हा पदार्थ करताना काय खबरदारी घ्यायला हवी हे देखील तिने सांगितले आहे..

क्रितीने लिहिलंय, जे मला शिकायला मिळालं ते म्हणजे- नंबर  १. चिया पुडिंगपेक्षा साध्या पुडिंगची टेस्ट खूप चांगली लागते..तेव्हा  हेल्दी बनवण्याच्या नादात त्याची खरी चव खराब करु नका..कंसात तिने म्हटलंय, हे डेझर्ट आहे सलाड नाही.' नंबर २. 'जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी हे बनवणार असाल तर यात डार्क चॉकलेट वापरु नका नाहीतर ते नक्कीच म्हणतील की हे कडू लागलतंय..'

Lessons Kriti Sanon learned while making a healthy chocolate ...

क्रितीने शेअर केलेल्या या चिया पुडींगच्या फोटोवर लुपाछुपी मधील तिचा सह कलाकार अभिनेता कार्तिक आर्यनने एक मजेशीर कमेंट केल आहे..कार्तिकने म्हटलंय, 'हे तर चाय पुडिंग वाटतंय'..कार्तिकच्या या कमेंटला उत्तर देत क्रितीने,'मिस्टर गवालियर चिया' म्हणत त्याला चिडवलंय...कार्तिकच्या गावाचं नाव ग्वालियार आहे...

Valentine's Day special: I'm a romantic at heart- Kartik Aaryan; I ...

क्रितीने त्याच्या गावाचं नाव बिघडवल्यामुळे अनेक नेटिझन्स नाराज झाले आहेत..अनेक युजर्सनी तिला ते नाव दुरुस्त करुन पुन्हा नीट लिहिण्यास सांंगितलं आहे..

सध्या अनेक सेलिब्रिटी शूटींग बंद असल्याने घरातंच सेल्फ क्वारंटाईन झालेले आहेत..घरातील वेळ घालवण्यासाठी ते घरात वेगवेगळे प्रयोग करताना पाहायला मिळत आहेत..कोणी घरच्या घरी व्यायाम कसा करावा हे सांगत आहे तर कोणी स्वयंपाकघरात जाऊन वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत..

kriti sanon made chia pudding kartik aaryan called it tea pudding


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kriti sanon made chia pudding kartik aaryan called it tea pudding