esakal | 'गणपत' मध्ये पाहा, टायगर-क्रितीचा सॉलिड लूक
sakal

बोलून बातमी शोधा

kriti sanon to reunite with tiger shroff in ganapath part 1 after heropanti

 विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'गणपत' मध्ये पाहा, टायगर-क्रितीचा सॉलिड लूक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  टायगर आता त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.  दोन महिन्यांपूर्वी टायगरने या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले होते. त्यात त्याचा अॅक्शन लूक पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजला होता. ”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं”, असा डायलॉग टायगरच्या तोंडी होता. सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. टायगर लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटातून समोर येणार आहे.

विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या टायगरच्या नावावरचा पडदा जरी दूर झाला असला तरी त्याच्यासोबत अजून कोणते कलाकार आहेत याची माहिती समोर आली नाही. 

हिरोपंतीनंतर टायगर आणि क्रिती सेननं गणपतमध्ये दिसणार आहे. यापूर्वी दोघांनी हिरोपंती चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ही जोडी गणपतमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. टायगरनं सोशल मीडियावर गणपतचा टीझर पोस्ट केला आहे. ज्यात क्रिती सेनन बाईकवर बसलेली दिसुन येत आहे. हा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. तिचा फोटो शेयर करुन त्याखाली लिहिले आहे की, मी असे ऐकले आहे की, उद्या सकाळी पावणे अकरा वाजता ती नक्की वळून बघणार आहे. त्यानंतर अनेकांनी हा अंदाज व्यक्त केला आहे की, त्या फोटोमध्ये असणारी अभिनेत्री कोण आहे याचा. त्यावर कित्येकांनी नोरा फतेही, सारा अली खान आमि क्रिती सेननचे नाव घेतले आहे. 

34 व्या वर्षी लिसाची तिस-या बाळंतपणाची तयारी; व्हिडिओ केला शेअर

पिंकविलानं दिलेल्या रिपोर्टनुसार गणपतमध्ये दोन अभिनेत्री दिसणार आहेत.  विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आजवर टायगरचे अनेक अॅक्शनपट बॉक्सऑफीसवर हिट झाले आहेत. आपल्या चित्रपटांतील बहुतांशी स्टंट हे तो स्वत करतो अशी त्याची ओळख आहे. त्याच्या या नवीन लूकविषयी तो म्हणतो, मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. या चित्रपटासाठी माझी, जॅकी भगनानी आणि विकास बहल यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली.  
 


 
 
 

loading image