कृतिका कामराचा प्रिसेंस लूक 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सोनी टीव्हीच्या "रिपोटर्स' या मालिकेत रिपोटरच्या भूमिकेत दिसलेली कृतिका कामरा काही दिवस छोट्या पडद्यापासून दूर होती; पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झालीय आणि तेही प्रिसेंस लूकमध्ये. लाईफ ओके चॅनलवर लवकरच "प्यार है या पहेली... चंद्रकांता' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेत प्रिंसेस चंद्रकांताच्या भूमिकेत कृतिका कामरा दिसणार आहे. कृतिकाने तिच्या लहानपणी चंद्रकांता ही मालिका दूरदर्शनवर पाहिली होती; पण त्याचे काही भागच तिने पाहिले होते आणि तिला त्यातलं आता काहीच आठवतही नाहीय. ही मालिका करायचं ठरलं तेव्हाही तिने जुनी मालिका न पाहणंच पसंत केलं.

सोनी टीव्हीच्या "रिपोटर्स' या मालिकेत रिपोटरच्या भूमिकेत दिसलेली कृतिका कामरा काही दिवस छोट्या पडद्यापासून दूर होती; पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झालीय आणि तेही प्रिसेंस लूकमध्ये. लाईफ ओके चॅनलवर लवकरच "प्यार है या पहेली... चंद्रकांता' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेत प्रिंसेस चंद्रकांताच्या भूमिकेत कृतिका कामरा दिसणार आहे. कृतिकाने तिच्या लहानपणी चंद्रकांता ही मालिका दूरदर्शनवर पाहिली होती; पण त्याचे काही भागच तिने पाहिले होते आणि तिला त्यातलं आता काहीच आठवतही नाहीय. ही मालिका करायचं ठरलं तेव्हाही तिने जुनी मालिका न पाहणंच पसंत केलं. कारण तिला चंद्रकांताची भूमिका तिच्या पद्धतीने साकारची होती. देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता' या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही मालिका असली, तरी खूप वेगळ्या पद्धतीने सादर करायची असं चॅनलने ठरवलं आहे. या मालिकेचे सेट्‌स, कास्टिंग आणि त्यांचे लूक्‍स यावर खूप मेहनत घेतली जातेय. पौराणिक मालिकांसाठी प्रसिद्ध असलेली डिझायनर निरूषा निखत यांनी या मालिकेची वेशभूषा डिझाईन केली आहे. कृतिका कामरासाठी चंद्रकांता या प्रिंसेसला नजरेसमोर ठेवत आजच्या काळाशीही ती कनेक्‍ट होईल, प्रेक्षकांना आपलीशी वाटेल, अशी वेशभूषा करायची होती आणि त्या पद्धतीने ती वेशभूषा करण्यात आली. त्यानंतर कृतिकाच्या ट्रायल्स घेण्यात आल्या. त्यामुळे सध्या कृतिकाच्या चंद्रकांता लूकमधील काही फोटो सोशल मीडिया आणि काही वेबसाईट्‌सवर चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेच्या लूकसाठी कृतिकाने वजन कमी केलंय. केशरचनेवर मेहनत घेतलीय; तसेच भाषाशैली आणि संवादांसाठीही ती वेगळा वेळ देतेय. एखादी भूमिका मन लावून करण्याचं कौशल्य कृतिकाकडे आहेच. आता तिच्या चंद्रकांता लूकमधील तिचा जादुई अभिनय प्रेक्षकांना कितपत आवडतो, याची उत्सुकता लागून राहिलीय.  
 

Web Title: kritika kamra princess look in chandrakanta