मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखशी तिसऱ्या लग्नासाठी तयार आमिर खान? या बड्या अभिनेत्यानं केला दावा..Aamir Khan Wedding with Fatima sana shaikh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Claims Aamir Khan And Fatima Sana Shaikh to get marry soon

Aamir Khan: मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखशी तिसऱ्या लग्नासाठी तयार आमिर खान? या बड्या अभिनेत्यानं केला दावा..

Aamir Khan: लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर दणकून आपटल्यानंतर आमिर खान लाइमलाइटपासून दूर आहे. पण आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. अर्थात यावेळी आमिर त्याच्या सिनेमामुळे नाही तर फातिमा सना शेख सोबतच्या पिकल बॉल खेळतानाच्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.(KRK Claims Aamir Khan And Fatima Sana Shaikh to get marry soon)

दंगल गर्ल फातिमा सना शेख सोबत आमिर खानचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या बातम्या जोरदार पसरल्या आहेत. यादरम्यान आता अभिनेता आणि स्वघोषित समिक्षक कमाल राशिद खान म्हणजे केआरकेनं खळबळजनक दावा करत सगळ्यांनाच हैराण करून सोडलं आहे.

केआरकेनं गुरुवारी म्हणजे २५ मे रोजी सकाळी ट्वीट करत लिहिलं,''ब्रेकिंग न्यूज. आमिर खान आपल्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर खान सनाला 'दंगल' फिल्मपासूनच डेट करत आहे''.

केआरकेनं दावा केल्यानंतर जो-तो हैराण झाला आहे. पोस्टवर दीपक कुमार नावाच्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'विश्वास नाही बसत यावर'. एकानं केआरकेची खिल्ली उडवत लिहिलं आहे,'एवढी मोठी बातमी शेअर केल्याबद्दल केआरके आभारी आहोत तुझे'.

आपल्या माहितीसाठी इथं नमूद करतो की फातिमा सना शेख आणि आमिर खान दंगल सिनेमात एकत्र दिसले होते. सिनेमात आमिरनं फातिमाच्या वडीलांची भूमिका केली होती. यानंतर दोघे ठग्स ऑफ हिंदुस्थानमध्ये मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसले होते. या सिनेमानंतर दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. अर्थात अद्याप ना आमिर यावर काही बोलला आहे ना फातिमा.

या अफवानं जास्त हवा तेव्हा मिळाली जेव्हा आमिर खाननं १६ वर्षानंतर आपली दुसरी पत्नी किरण राव हिला देखील घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा आमिर फातिमासोबत पिकबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या थेट लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.