'अरे 80 वर्षाचा म्हातारा दिसतोय...', अभिनेत्यानं सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' ची इज्जतच काढली! KRK On Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan

KRK: 'अरे 80 वर्षाचा म्हातारा दिसतोय...', अभिनेत्यानं सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' ची इज्जतच काढली!

सलमान खान स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' आज ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाची अ‍ॅडव्हास बुकिंग फुल झाली होती. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश, भूमिका चावला, जगपती बाबू, विजेंदर सिंग, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकार आहेत. साडेतीन वर्षांनंतर सलमान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सूक आहेत.

तर त्याच्या चाहत्यांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. त्यांना चित्रपट खुपच आवडला आहे. तर काहींना हा चित्रपटत मुळीच पसंत पडलेला नाही. त्यांना चित्रपटाचा इटरव्हल आवडलेला नाही .

दरम्यान आता या सगळ्यामध्ये स्वत:ला समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल रशीद खान उर्फ ​​केआरकेने सलमान खानच्या चित्रपटाबाबत मोठा दावा केला आहे. इतकच नाही तर या चित्रपटाबद्दल त्याने अनेक ट्विटही केले आहेत.

KRK ने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे, "KHHKKT चित्रपट पहिल्या दिवशी 7-9 कोटींची साधारण कमाई करू शकेल हे अंतिम आहे. मी सांगितले होते की, मी 10 क्रॉस होऊ देणार नाही. सिद्ध केले."

याआधी केआरकेने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल ट्विट कपत लिहिले होते की, "माझ्या सूत्रांनुसार, उद्या 'किसी का भाई किसी की जान'चे निर्माते स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी स्वत:च तिकीट खरेदी करतील . पण सत्य हे आहे की कोसळणाऱ्या ताऱ्यांला कोणीही वाचवू शकत नाही.

त्यानंतर आता त्याने या चित्रपटसंबधित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात तो सांगतोय की तो आता हा चित्रपट पाहण्यासाठी थेअटर मध्ये आला आहे. आणि त्याने या चित्रपटाचा फर्स्ट हाफ पाहिला जो अत्यंत खराब आहे.

याआधीही त्याने एक ट्विट शेअर केल होत ज्यात त्याने लिहिले होते की हा चित्रपट डिझास्टर आहे. सलमान खान 80 वर्षाचा म्हातारा दिसत आहे. तर 60 वर्षाचा सलमान त्याच्या पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत रोमांस करत आहे. हो खुप मोठा विनोद आहे. तर त्याने यात शहनाजचं कौतुक केलं आहे.

सध्या सोशल मिडियावर त्याच्या या ट्विटची चर्चा सुरु आहे. किसी का भाई किसी की जान आज जगभरात 5700 स्क्रीन्सवर रिलीज होत आहे, ज्यामध्ये भारतात 4500 स्क्रीन्स आणि परदेशात 1200 स्क्रीन्सचा समावेश आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.