'बलात्कारी मित्राची बाजू घेता, तुम्ही खरचं सेलिब्रेटी आहात का?'

त्यानं काही दिवसांपूर्वी बॉलीवूडच्या भाईजानशी पंगा घेतला होता.
kamal r khan
kamal r khan Team esakal

मुंबई - पर्ल वी पुरीचं (pearl v puri) प्रकरण सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पर्लवर एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्या समर्थनार्थ मनोरंजन विश्वातील अनेकांनी पुढाकार घेतला आहे. त्यात अनेक दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक यांचाही समावेश आहे.त्या वादात आता केआरके खाननंही उडी घेतली आहे. ज्यांनी पर्ल वी पुरीला पाठींबा दिला आहे त्यांचा त्यानं क्लास घेतला आहे. यावेळी त्यानं बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्यावर झालेल्या आरोपाची आठवण करुन दिली आहे. (krk slams all the industry supporters of pearl v poori says they all are criminal)

कमाल राशिद खाननं (kamal rashid khan) बॉलीवूडच्या भाईजानशी पंगा घेतला होता. त्यात त्यानं त्याच्यावर अनेक आरोप केले. सलमाननं त्याला प्रत्युत्तर न देता त्याच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. ते प्रकरणही सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला होता. मात्र कमाल खान दररोज नवनवीन खुलासे करुन सलमानला आव्हान देत असल्याचेही दिसून आले आहे.

कमाल खाननं सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्ल वी पुरीवर निशाणा साधला आहे. त्याची बाजू घेणा-या अनेक सेलिब्रेटींवर त्यानं टीका केलीय. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केआरकेनं पर्लवर त्यानं परखड शब्दांत खडे बोल सुनावले आहे. यावेळी केआरकेनं बॉलीवू़डचा अभिनेता शायनी अहूजाचा दाखला दिला आहे. यामुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

kamal r khan
'कॅन्सरला घाबरले नाही, त्याला सामोरी गेले अन् लढाई जिंकली'
kamal r khan
'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल

कमालनं लिहिलं आहे की, तुम्ही जर तुमच्या मित्राला वाचविण्यासाठी एखाद्या अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करत असाल तर ते चूकीचे आहे. अशावेळी तुम्ही स्वतला सेलिब्रेटी म्हणवून घेण्यास पात्र नाही. ज्या सेलिब्रेटींनी पर्ल वी पुरीच्या समर्थनार्थ व्टिट केले होते त्यांना कमाल खानने उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com