'अजय देवगणनं केला अभिषेक बच्चनचा गेम..', केआरके नं ट्वीट करत सोशल मीडियावर उडवली खळबळ KRK Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Tweet

KRK Tweet: 'अजय देवगणनं केला अभिषेक बच्चनचा गेम..', केआरके नं ट्वीट करत सोशल मीडियावर उडवली खळबळ

KRK Tweet: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित 'भोला ३०' मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता आणि जगभरात या सिनेमानं बॉक्सऑफिसवर १२३ करोडचा गल्ला जमवला. हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या 'कैथी' या तामिळ सुपरहिट सिनेमाचा अधिकृतरित्या केलेला रीमेक आहे.

तामिळ सिनेमात अभिनेता कार्थीनं मध्यवर्ती भूमिका साकारली होती तर सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश कनगराजनं केलं होतं. कथा बाप-लेकीवर आधारित होती ज्यात जबरदस्त अॅक्शनही पहायला मिळाली तर इमोशन्सचा खच्चून भरणा देखील होता.

आता अजयचा 'भोला' पुन्हा चर्चेत आलाय ते केआरकेनं'भोला २' विषयी केलेल्या वक्तव्यामुळे. यामध्ये त्यानं अजय देवगण आणि अभिषेक बच्चनची खिल्ली उडवली आहे.(Krk tweet bholaa 2 ajay devgn abhishek bachchan)

केआरकेची ही सवय आहे की त्याला प्रत्येक सेलिब्रिटी आणि स्टार्सच्या सिनेमांवर टिका करायची वाईट सवय आहे. तो प्रत्येक सिनेमाची खिल्ली उडवताना दिसतो. आता कमाल रशिद खाननं अजय देवगण आणि अभिषेक बच्चनची मस्करी करत तिखट वक्तव्य केली आहेत. त्यानं 'भोला २' विषयी भविष्यवाणी केली आहे.

केआरकेनं ट्वीट करत लिहिलं आहे,''अभिषेक बच्चन वाट पाहतोय 'भोला २' ची आणि अजय देवगणने तर दक्षिणेकडचा सुपरस्टार आर माधवनसोबत आपल्या नव्या सिनेमाच्या शूटला सुरुवातही केली. लो करलो बात..अजयनं बिचाऱ्या अभिषेकचा गेम केला..हे चांगलं नाही झालं..''

सिनेमागृहात रिलीज झाल्याच्या एक महिन्याहून अधिकाळानंतर अजय देवगणचा 'भोला' सिनेमा प्राइम व्हिडीओ वर स्ट्रीम होत आहे. ज्या लोकांना तो पहायचा आहे,त्यांना ३९९ रुपयांचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल.त्यानंतर ते सिनेमाचा आनंद लुटू शकतील.

या अॅक्शन,थ्रीलर सिनेमात तब्बू, दीपक डोबरियाल,संजय मिश्रा आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाहरुख खान,दीपिका पदूकोण,जॉन अब्राहमच्या 'पठाण' सिनेमानंतर सगळ्यात अधिक कमाई करणारा 'भोला' हा चौथा हिंदी सिनेमा ठरला आहे.