राजू श्रीवास्तवच्या वक्तव्याला 'बकवास' म्हणत कृष्णा अभिषेकचं भारती सिंहला समर्थन

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 30 November 2020

कॉमेडियन किकू शारदाने म्हटलं होतं की भारती शोमधून बाहेर जाणार असल्याचं त्याने ऐकलेलं नाही. यातंच आता कॉमेडियन कृष्णा अभिषेकने खुलेआम भारती सिंहचं समर्थन केलं आहे. 

मुंबई- कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचिया जेव्हापासून ड्रग केसमध्ये अडकले आहेत तेव्हापासून सतत अशी चर्चा ऐकायला मिळतेय की प्रसिद्ध टीव्ही कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमधून भारती सिंहला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. मात्र नुकतंच प्रसिद्ध वृत्तपत्रासोबत बोलताना कॉमेडियन किकू शारदाने म्हटलं होतं की भारती शोमधून बाहेर जाणार असल्याचं त्याने ऐकलेलं नाही. यातंच आता कॉमेडियन कृष्णा अभिषेकने खुलेआम भारती सिंहचं समर्थन केलं आहे. 

हे ही वाचा: ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूरने थाटामाटात बांधली तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ  

कृष्णा अभिषेकने टाईम्स ऑफ इंडियासोबतच्या मुलाखतीत सांगितलं की ''भारतीला 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेर केलेलं नाही. मी चॅनलकडून असं काहीही ऐकलेलं नाही. चॅनलने असा कोणतीही निर्णय घेतलेला नाही. आणि जर असं काही झालंच तर मी भारतीला पाठिंबा देईन. तिला कामावर पुन्हा गेलं पाहिजे. जे झालं ते झालं. आम्ही भारती आणि कपिल शर्मा दोघांसोबत आहोत. भारतीला माझं विनाअट समर्थन आहे.'' 

Bharti Singh of The Kapil Sharma Show pledges unconditional love for Krushna  Abhishek on his birthday; makes stunning revelation on postponing pregnancy  due to COVID-19 pandemic

तर कृष्णाने प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या वक्तव्यांना बकवास म्हटलं आहे. त्याने म्हटलंय, ''राजू श्रीवास्तव यांनी खूप बकवास केली आहे. ते जे काही बरळले ते आश्चर्यकारक आहे. त्याने सगळ्यांसोबत आयुष्यभराची नाती खराब केली. त्यांनी जी काही टिपण्णी केली त्याने 'द कपिल शर्मा शो'ची संपूर्ण टीम नाराज आहे. ''   

krushna abhishek come in support of bharti singh given statement on raju srivastava  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: krushna abhishek come in support of bharti singh given statement on raju srivastava