‘कोणं म्हटलं मी कपिल शो सोडणार म्हणुन'?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 7 November 2020

कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शो’ सोडणार का? असा प्रश्न त्याला त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. कपिलच्या कार्यक्रमावर याअगोदर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता.

मुंबई - द कपिल शर्मा शो सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेवर वाह्यात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कपिलच्या शो बाबत उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. विशेषत; सोशल मीडियावर त्याच्यावर नेटक-यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता या शो वरुन  अभिनेता कृष्णा अभिषेक ट्रोल होऊ लागला आहे. तो हा शो सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्याने एक विधान केले आहे.

कृष्णा अभिषेक  द कपिल शर्मा शो’ सोडणार का? असा प्रश्न त्याला त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. कपिलच्या कार्यक्रमावर याअगोदर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत कृष्णा हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. अलिकडेच अभिनेता मुकेश खन्ना यांनी देखील कपिल शर्मावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर कृष्णा अभिषेक शोला रामराम ठोकणार अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे. या चर्चेवर अखेर स्वत: कृष्णाने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, “मला विनोदी भूमिका साकारायला खूप आवडतं. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून त्या भूमिका साकारण्याची संधी मला मिळते. हा एक पारिवारिक शो आहे. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन या शोमधून केलं जातं. काही लोक यावर टीका करतात पण तो त्यांचा दृष्टीकोण आहे. मी हा शो सोडणार नाही. या चर्चा केवळ अफवा आहेत. प्रेक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्यास बरे होईल.

शेवंताबाईंची गोष्टच वेगळी होती,पम्मीचं तसं नाहीये'

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून प्रसिध्द आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या विनोदी मुलाखती या शो मध्ये घेतल्या जातात. मात्र गेल्या काही काळात या शोमधील विनोद, त्याचा दर्जा, त्यात काम करणारे अभिनेते ते साकारत असलेल्या भूमिका यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 
अभिनयात बाप आहेच पण 'रोमान्स' करण्यातही 'कमल' ची बरोबरी नाही

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: krushna abhishek comment on kapil sharma show