'द कपिल शर्मा शो'मध्ये मामा गोविंदासमोर परफॉर्म करण्यासाठी कृष्णाने दिला होता नकार, म्हणाला..

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 16 November 2020

काही दिवसांपूर्वीच गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. जिथे त्याने दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये सहभाग घेतला. मात्र या एपिसोडमध्ये त्याचा भाचा आणि शोमध्ये सपनाचं पात्र साकारणारा कृष्णा अभिषेक दिसून आला नाही. यावर आता कृष्णाने स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबई- कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. अनेक काळ गेल्यानंतरही दोघांमधील तणाव काही कमी होत नाही. काही दिवसांपूर्वीच गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. जिथे त्याने दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये सहभाग घेतला. मात्र या एपिसोडमध्ये त्याचा भाचा आणि शोमध्ये सपनाचं पात्र साकारणारा कृष्णा अभिषेक दिसून आला नाही. यावर आता कृष्णाने स्पष्टीकरण दिलं आहे. 

हे ही वाचा: सलमान खान म्हणाला, दिशा तर बॉयफ्रेंडसोबत थायलंडमध्ये आहे, राहुल वैद्यच्या मनात झाली धाकधुक  

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने एपिसोडमध्ये उपस्थित नसण्यावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, ''मला जवळपास १० दिवस आधी चीची मामा शोमध्ये येणार असल्याबद्दल कळालं कारण यावेळी मामी सुनीताने त्यांच्यासोबत हजेरी लावली नाही. त्यामुळे माझ्या टीमला वाटलं की मला परफॉर्म करण्यास हरकत नसावी. गेल्या वर्षी सुनीता मामीला तिच्यासमोर मी परफॉर्म करायला नको होतं. मात्र यावेळी हा निर्णय मी घेतला की मी चीची मामासमोर परफॉर्म करणार नाही. तो पुढे म्हणाला, मी चीची मामासोबत एक चांगलं नातं शेअर करतो. मात्र त्या वादानंतर सगळं बदललं. त्यामुळे मी खूप दुःखी झालो. जेव्हा नात्यांमध्ये तणाव असतो तेव्हा कॉमेडी करणं कठीण होऊन बसतं.''

कृष्णाच्या म्हणण्यानुसार त्याने कित्येकदा मामा गोविंदाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही पॉझिटीव्ह प्रतिसाद दिला नाही.   

krushna abhishek on perform in front of govinda special episode of the kapil sharma show  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: krushna abhishek on perform in front of govinda special episode of the kapil sharma show