संदीपचा आगामी 'कृतांत'...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अभिनेता संदीप कुलकर्णी यांपैकीच एक म्हणायला हरकत नाही. संदीपने मराठीसह हिंदीतही त्याच्या वेगळ्या अभिनयाची छाप सोडलीयं. मात्र, संदीप त्याच्या आगामी मराठी चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसतोय. ‘कृतांत’ या चित्रपटातील हटके लूकसाठी संदीपने फार मेहनत घेतलीय.

नुकतंच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला. यामध्ये संदीपचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. ‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटांच दिग्दर्शन दत्ता भंडारे यांनी केलंय. तसंच दत्ता यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही केलंय. ‘कृतांत’ची कथा सध्याच्या राहणीमानावर आधारित असेल. आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आलाय. संदीपबरोबरच या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: krutanta marathi movie of sandip kulkarni