कृती खरबंदा पडली बेशुद्ध 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अभिनेता इमरान हाश्‍मीच्या "राज रिबूट' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कृती खरबंदा सध्या "शादी में जरूर आना' या चित्रपटाचे अलाहाबादमध्ये चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणावेळी ती बेशुद्ध पडली होती.

कृती तप्त उन्हात शूटिंग करत होती. त्यादिवशी तिला सकाळपासूनच बरे वाटत नव्हते; मात्र शुद्धीवर आल्यानंतर तिने औषध घेऊन पुन्हा शूटिंग केले. "शादी में जरूर आना'ची निर्मिती विनोद बच्चन आणि सौंदर्या प्रॉडक्‍शन करत असून, रत्ना सिन्हा त्याचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात कृतीसह राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  
 
Web Title: kruti kharbanda shadi main jarur aanaa serial