गायक कुमार सानू आता वळणार प्रादेशिक संगीताकडे

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जिये तो जिये कैसे.., एक लडकी को देखा तो एेसा लगा, सांसो की जरूरत है जैसे.. अशी एकापेक्षाएक हिट गाणी ज्यांच्या नावावर आहेत ते ज्येष्ठ गायक कुमार सानू सध्या कुठेच चर्चेत नाहीत. एक काळ असा होता जिथे प्रत्येक चित्रपटातील गाण्यात कुमार सानू यांचे गाणं असायचं. पण आता मात्र जशी नव्या गायकांची फळी आली, तशी कुमार सानू यांचा आवाज दुर्मिळ झाला. आता मात्र कुमार यांना प्रादेशिक संगीतामध्ये रुची आली आहे. 

मुंबई : जिये तो जिये कैसे.., एक लडकी को देखा तो एेसा लगा, सांसो की जरूरत है जैसे.. अशी एकापेक्षाएक हिट गाणी ज्यांच्या नावावर आहेत ते ज्येष्ठ गायक कुमार सानू सध्या कुठेच चर्चेत नाहीत. एक काळ असा होता जिथे प्रत्येक चित्रपटातील गाण्यात कुमार सानू यांचे गाणं असायचं. पण आता मात्र जशी नव्या गायकांची फळी आली, तशी कुमार सानू यांचा आवाज दुर्मिळ झाला. आता मात्र कुमार यांना प्रादेशिक संगीतामध्ये रुची आली आहे. 

याबद्दल बोलताना कुमार म्हणाले, 'प्रत्येक गायकाचा एक काळ असतो. मी अजूनही गाऊ शकतो. पण मी काम मागायला नाही जाणार. आता मी कुणाकडेही काम मागायला जाणार नाही. इतकी वर्षं काम केल्यानंतर मी स्वत:चं असं एक स्थान बनवलं आहे. आता मी कुणाकडे मला काम द्या असं म्हणणार नाही. त्यापेक्षा मी स्टेज शो करेन. मी प्रायव्हेट अल्बम्सवर लक्ष देईन. इतकंच नाही तर प्रादेशिक चित्रपटातल्या संगीताकडेही मी आता वळणार आहे.'

 

Web Title: kumar sanu now regional movie esakal news