
बिग बॉसचे चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोणत्या सेलिब्रिटींची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे.
मुंबई- जेव्हा पासून सलमान खानने त्याच्या 'बिग बॉस १४' या टीव्ही रिऍलिटी शोचा प्रोमो सोशल मिडियावर सादर केला आहे तेव्हापासून या शोची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता या शोचे चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोणत्या सेलिब्रिटींची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी शोमध्ये स्पर्धक म्हणून 'कुमकुम भाग्य' मालिकेतील अभिनेत्री नैना सिंहने तिची जागा पक्की केली आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी तर यावेळी सप्टेंबरमध्येच हा शो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा शो टीव्हीवर टेलिकास्ट केला जाईल अशी चर्चा आहे.
शोची थीम यावेळी जंगलाची असणार असल्याचं कळतंय. सोबतंच सद्यपरिस्थिती पाहता निर्मात्यांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केलेला आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसंच घरात देखील कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानूने देखील निर्मात्यांसोबत चर्चा पूर्ण केली आहे. त्यामुळे जान सानूची देखील स्पर्धक म्हणून जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये नेहा शर्मा, जॅस्मिन भसिन, विवियन डिसेना, जान खान, शांतिप्रिया, शगुन पांडे, स्नेहा उल्लाल, डोनल बिष्ट, आलिशा पंवर, पवित्रा पुनिया, आकांशा पुरी या नावांची चर्चा आहे.
kumkum bhagya actress naina singh and kumar sanu son jaan sanu to enterbigg boss 14