'आता वेळ महात्मा गांधींऐवजी हरिष साळवे यांचा फोटो लावण्याची'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 12 November 2020

याप्रकरणी मुंबईतील वकील रिजवान सिध्दिकी यांनी अटॉर्नी जनरल यांना पत्र पाठवले आहे. सिध्दिकी यांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कामरा यांनी केलेली टीका खेदजनक आहे.

मुंबई - स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. यावरुन आपल्यावर काय टीका होऊ शकते याची त्याला पर्वा नसते. आपल्या उपहासात्मक बोलण्याच्या शैलीमुळे तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या कुणालने आता थेट भारतातील प्रसिध्द वकील हरिष साळवे यांच्याशी पंगा घेतला आहे. साळवे हे रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वकील आहे. नुकताच गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून त्यावर कुणालने नाराजी व्यक्त केली आहे. 

कुणालने व्टिटवर आपली परखड प्रतिक्रिया व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर अनेकांना त्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी धारेवर धरले आहे. कुणालने अर्णब यांची जामिनावर मुक्तता होताच न्यायधीशांवरही टीका केली आहे. काही फोटो शेयर केले आहेत. यावर अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांच्याकडे कुणालच्या विरोधात केस दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी मुंबईतील वकील रिजवान सिध्दिकी यांनी अटॉर्नी जनरल यांना पत्र पाठवले आहे. बार अँड बेंच डॉट कॉमवर प्रसिध्द झालेल्या एका रिपोर्टनुसार, सिध्दिकी यांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कामरा यांनी केलेली टीका खेदजनक आहे. त्यांनी न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यावर केलेली टीका याबरोबर मॉर्फ केलेले काही फोटो आपल्या व्टिटरवर शेयर केले आहेत.

Image

याचा उल्लेख सिध्दिकी यांनी आपल्या पत्रात केला आहे. कुणालच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे सर्वोच्च् न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. बुधवारी कामराने अर्णब गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. यावर त्याने व्टिटवर लिहिले की, 'ज्याप्रमाणे सर्वोच्च न्य़ायालय 'राष्ट्रहिता'साठी पुढाकार घेते ते पाहता आता महात्मा गांधी यांच्या जागी हरिश साळवे यांचे फोटो लावण्याची वेळ आली आहे. असे म्हणावे लागेल.'

Image

याशिवाय कुणालने आणखी तीन व्टिट केले आहेत त्यात त्याने सर्वोच्च न्यायालयाचा फोटो मॉर्फ करुन वापरला आहे. या फोटोमध्ये सर्वोच्च न्यायालय हे भगव्या रंगात दिसत आहे. तर दुसरीकडे बीजेपीचा झेंडा आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Kamras Tweets on Supreme Court photo morphed