'हिंमत असेल तर, सर्वोच्च न्यायालयात हरिष साळवेंना हरवून दाखवा'

Kunal Karmas Tweets on Supreme Court lawyer harsh salve
Kunal Karmas Tweets on Supreme Court lawyer harsh salve

मुंबई - स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिध्द असणारा कुणाल कामरा कायम त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टीकेमुळे सर्वांच्या टीकेचे लक्ष्य ठरला होता. सध्या त्याने भाजप आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भाजपचा झेंडा असे एक छायाचित्र त्याने मागे सोशल मीडियावर प्रसिध्द केले होते. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

कुणालने आता देशातील प्रख्यात वकील हरिष साळवे यांच्यावर एक व्टिट केले आहे. त्यात त्याने त्यांची खिल्ली उडवली आहे. असे त्याने केवळ एकच व्टिट केले आहे असे नाही तर आणखी दोन ते व्टिट केले आहेत. त्याचही त्याने साळवे यांच्यावर आपल्या तिरकस शैलीतून टोमणे मारले आहेत. भारताचे सध्या चीन बरोबर तणावाचे संबंध आहेत. त्यावरुन कुणाल चीनला उद्देशुन म्हणतो, नुसतीच सीमेवर काय ताकद दाखवता, तुमच्यात हिंमत असेल तर सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवे यांना आवाहन देऊन त्यांच्याकडून केस जिंकून दाखवा. अशी शेरेबाजी त्याने केली आहे.

चीनबरोबर त्याने बांग्लादेशलाही सुनावले आहे त्याविषयी व्टिट करताना तो म्हणतो, जीडीपी या विषयावर आपण स्पर्धा का करायची, तुमच्याजवळ असा कोणी एखादा वकील आहे का की जो ओव्हरनाईट टॅक्स लॉ मध्ये काही तरतुदी करु शकेल. तर नेपाळला उद्देशुन म्हणताना कुणालने लिहिले आहे की, नेपाळवासीयांनो तुम्ही जरा शांत राहा. तुमची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या केसेस येथील न्यायालयात पेंडिंग आहेत. विशेष म्हणजे कुणालच्या यासगळ्या व्टिटला नेटक-यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्याच्या या प्रत्येक व्टिटला किमान हजारापेक्षा जास्त रिव्टिट मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी कुणालने आता वेळ आली आहे 'महात्मा गांधींऐवजी हरिष साळवे यांचा फोटो लावण्याची' असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुनही मोठा गदारोळ झाला होता. साळवे हे रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वकील आहे.

नुकताच गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून त्यावर कुणालने नाराजी व्यक्त केली होती. कुणालने अर्णब यांची जामिनावर मुक्तता होताच न्यायधीशांवरही टीका केली होती. यावर अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांच्याकडे कुणालच्या विरोधात केस दाखल करावी अशी मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईतील वकील रिजवान सिध्दिकी यांनी अटॉर्नी जनरल यांना पत्र पाठवले होते. 

बार अँड बेंच डॉट कॉमवर प्रसिध्द झालेल्या एका रिपोर्टनुसार, सिध्दिकी यांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कामरा यांनी केलेली टीका खेदजनक आहे. त्यांनी न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यावर केलेली टीका याबरोबर मॉर्फ केलेले काही फोटो आपल्या व्टिटरवर शेयर केले आहेत. याचा उल्लेख सिध्दिकी यांनी आपल्या पत्रात केला आहे. कुणालच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे सर्वोच्च् न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. 
  

 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com