Kushal Badrike: तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं... कुशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike shared post about his negative role kurbat khan in ravrambha movie

Kushal Badrike: तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं... कुशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

Kushal Badrike: विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे.

‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. या चित्रपटातील भूमिकेविषय कुशलने एक पोस्ट शेयर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(Kushal Badrike shared post about his negative role kurbat khan in ravrambha movie )

या पोस्टमध्ये कुशल म्हणतोय, ''खरतर ऐतिहासिक सिनेमां मध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा” एखादा “मावळा” व्हावं आणि स्वराज्याच्या लढ्यात आपण स्वतःला झोकून द्याव असं प्रत्येक मराठी नटाचं स्वप्न असतं, पण “राव-रंभा” ह्या सिनेमात माझ्या नशिबात हा कुरबत खान आला''

''माझे दिग्दर्शक अनुप जगदाळे सर यांना माझ्यात हा कुरबत दिसला आणि मग नव्या सिनेमाचा प्रवास सुरु झाला , प्रत्येक नवा सिनेमा काहीतरी शिकवून जातो , एक नवीन जीवन, नवीन अनुभव देऊन जातो, मी माझी भूमिका प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला पण तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं.'' अशी भावनिक पोस्ट कुशलने केली आहे.

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडीच्या मंचावरून गेली अनेक वर्ष कुशलने लोकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कुशल आपल्या अचूक क़ॉमेडी टायमिंगमुळे घराघरात प्रसिद्ध आहेच पण त्याने गंभीर भूमिकाही चांगल्या सकरल्या आहेत. पण ती त्याची पहिलीच नकारात्मक भूमिका असल्याने सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे.