देव पटेलला 'लायन'साठी 'बाफ्टा' पुरस्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बाफ्टा पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या ला ला लँड हा चित्रपट 26 फेब्रुवारीला घोषणा होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांतही मजबूत दावेदार आहे.

लंडन - 70 व्या ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार (बाफ्टा) सोहळ्यात दिग्दर्शक डेमियन शजैल यांच्या 'ला ला लँड' चित्रपटाला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले. तर, भारतीय अभिनेता देव पटेलला 'लायन'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

बाफ्टा पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या ला ला लँड हा चित्रपट 26 फेब्रुवारीला घोषणा होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांतही मजबूत दावेदार आहे. या पुरस्कार सोहळ्यात एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. 'मॅचेस्टर बाय द सी' या चित्रपटातील भूमिकेसाठी केसी अफ्लेकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

'फेसिस' या चित्रपटासाठी वियोला डेव्हिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गोल्डन ग्लोब्ज पुरस्कारात मर्लिन स्टीपने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या पुरस्कारात एमा स्टोन अप्रत्यक्षरित्या ट्रम्प यांना लक्ष्य केले.

Web Title: la la land dominates baftas dev patel wins for lion