
Javed Khan Amrohi Passes Away: 'लगान' फेम जावेद खान अमरोही यांचे निधन..'या' आजाराशी देत होते झुंज
Javed Khan Amrohi Passes Away: बॉलीवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी जवळपास १५० सिनेमांमध्ये काम केले होते. याव्यतिरिक्त टीव्ही जगतातही ते प्रसिद्ध होते.
त्यांनी अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत लोकांचे मनोरंजन केले आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय हे कळू शकलेले नाही. पण त्यांच्या निधनानं सिनेजगतावर शोककळा पसरली आहे.(Lagan Fame Javed Khan Amrohi passes Away)
जावेद खान अमरोही यांना २००१ साली आलेल्या 'लगान' सिनेमासाठी बेस्ट सपोर्टिंग कॅटॅगरीत अकादमी अॅवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. याव्यतिरिक्त 'अंदाज अपना अपना','चक दे इंडिया' मधील त्यांच्या भूमिका देखील प्रशंसा मिळवून गेल्या होत्या.
जावेद खान यांनी 'मिर्जा गालिब' या मालिकेत देखील काम केले होते. जावेद खान अमरोही यांनी झी इन्स्टिट्युट ऑफ मीडिया आर्ट्स मध्ये अॅक्टिंग फॅकल्टी म्हणून देखील काम पाहिलं आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी 'चंद्रकांता' फेम अखिलेंद्र मिश्रा यांनी आपल्या फेसबूक हॅंडलवरनं दिली आहे.
जावेद खान काही दिवसांपासून श्वसनासंबंधित आजाराशी झुंज देत होते असं समोर आलं आहे. गेल्या वर्षभरापासून ते अंथरुणाला खिळून होते हे देखील कळतंय.
त्यांना सांताक्रूझच्या सूर्या नर्सिंग इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं सांगितलं जात आहे. त्यांची फुफ्फुसं निकामी झाली होती असं देखील सांगण्यात येत आहे.

Javed Khan Amrohi Passes Away
जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक सपोर्टिंग रोल साकारले आहेत, तसंच अनेक सिनेमातून त्यांनी कॅमिओ देखील साकारले आहेत.
त्यांनी तब्बल १५० सिनेमातील बहुरंगी भूमिकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनील शेट्टी अभिनित 'फिर हेरा फेरी' सिनेमात पोलिस हवालदाराची भूमिका साकारून त्यांनी लोकांचे निखळ मनोरंजन केले होते.