"लाल सिंह चढ्ढा' येणार आता पुढील वर्षीच..

lal singh
lal singh

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असून इतर देशांप्रमाणे भारतालाही या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेबरोबरच इतर क्षेत्रांवरही होताना दिसत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे कार्यालये, कंपन्या, दुकान सर्व काही बंद आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा परिणाम चित्रपटसृष्टीवरही होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीचे यामुळे खूप नुकसान होत आहे. लॉकडाऊन घोषित केल्याच्या काळात काही चित्रपट प्रदर्शित झाले होते; मात्र तेथे पुरेशी कमाई न झाल्याने त्यानंतर ते चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. तर अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही चित्रपटांचे चित्रीकरणही थांबले आहे. अशातच अभिनेता आमिर खानची मुख्य भूमिका असलेला "लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. 

अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला "लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता; मात्र एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित न होता पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले की, "लाल सिंह चढ्ढा' चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता; पण आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे आणि त्यामुळे आता हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

"लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाबरोबरच दिग्दर्शक रोहित शेट्टीचा "सूर्यवंशी' आणि अभिनेता रणवीर सिंहचा "83' चित्रपटही कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने पुढे ढकलण्यात आले आहेत. याशिवाय अभिनेता सलमान खान "राधे' चित्रपट सुद्घा पुढे ढकलण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com