"लपाछपी' चित्रपटाने गाठले लंडन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

येत्या 14 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या "लपाछपी' या चित्रपटाने सध्या लंडन गाठले आहे.

लंडन येथे होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी या चित्रपटाला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सातासमुद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झालेला "लपाछपी' हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येही झळकला आहे.

मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील आणि वाईल्ड एलिफन्ट मोशन पिक्‍चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सूर्यवीरसिंग भूल्लर निर्मित "लपाछपी'चे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे.

तसेच याचे लेखन विशाल फुरिया आणि विशाल कपूर या दोघांनी मिळून केले आहे. अभिनेत्री पूजा सावंतवर आधारित असलेल्या या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्येही आपले नशीब आजमावले आहे. 

Web Title: Lapachhapi movie in london indian film festival