
Lata Mangeshkar Anniversary: शाहरुख खानच्या 'त्या' कृतीमुळे लता मंगेशकर यांच्या मृत्यूला धार्मिक वळण
Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर ६ फेब्रुवारी २०२२ ला काळाच्या पडद्याआड गेल्या. लता मंगेशकर यांना शासकीय इतमामात शिवाजी पार्कला अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित होता. पण सुपरस्टार शाहरुख खानच्या एका कृतीमुळे त्यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले.
(Lata Mangeshkar's death takes a religious turn due to Shahrukh Khan's 'that' act)
लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचं पार्थिव शिवाजी पार्कला उभारण्यात आलेल्या एका मंचावर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत लता दीदींचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवा मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. शाहरुखने प्रार्थना केल्यानंतर त्याने मास्क बाजूला केला आणि तो थुंकला. हि कृती वादग्रस्त ठरली. शाहरुखच्या या कृतीमुळे त्याला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं.
अनेकांनी शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा केला. काही राजकीय नेत्यांनी या कृतीला धार्मिक वळण दिले. त्यामुळे नाहक वाद निर्माण झाला. शाहरुख थुकला नव्हता तर तो दुवा फुंकला होता. मुस्लिम धर्मामध्ये हि प्रथा आहे, याचा उलगडा नंतर झाला आणि सर्वांची तोंडं बंद झाली. लतादिदींच्या अंत्यसंस्काराच्या इतक्या संवेदनशील प्रसंगी हा वेगळाच वाद निर्माण होऊन चर्चा सुरु झालेली.
शाहरुख खानने या वादात अजिबात उडी न मारता मौन बाळगलं. शाहरुख खान आणि लता मंगेशकर यांचं नातं खास होतं. शाहरुखच्या अनेक सिनेमांमध्ये लतादीदींनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली.
लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी आहे. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आणि त्यांच्या स्मृती मनातून निघून जाणं शक्य नाही. दिवसातून एकदा तरी कळत नकळत पणे लता मंगेशकर यांची गाणी असंख्य लोकं ऐकत असतात. विचारांचे वादळ असलेल्या मनाला शांततेचा किनारा मिळतो. आज लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त अनेक कलाकार त्यांना मानवंदना देत आहेत.