बापरे ! वाजिद यांच्या आईला देखील झाली कोरोनाची लागण...

wajid mother
wajid mother

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद प्रसिद्ध जोडीपैकी एका जोडीदाराने वाजिद खानने आज जगाचा निरोप घेतला. वाजिद यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना किडनी संबंधी त्रास होता याकरणाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला आहे.

सर्वात जास्त दुखः सध्या त्यांच्या कुटुंबाला झाले असून त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना वाजिदला भेटू दिलं नाही. सर्वात धक्कादायच बाब म्हणजे वाजिद यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झालेली आहे.  

साजिद-वाजिद यांची आई रजिया खान यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वाजिद यांची आई रजिया या देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आणि यावेळी त्या मुंबईतील चेंबूर येथील सुरणा रुग्णालयात आहेत. त्याच रुग्णालयात ज्या रुग्णालयात वाजिद  यांनी अखेचा श्वास घेतला.

त्यांची प्रकृती ठीक असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत आहे. रजिया या वाजिद यांच्यासोबत त्यांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबल्या होत्या. त्यावेळी इतर कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

याचबरोबर गायिका ममता शर्मा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार वाजिद यांच्या आईला वाजिद यांचे अंतिम दर्शन घेऊ दिले नाही कारण त्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्या म्हणाल्या,' वाजिद यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांनी वाजिदच्या निधनाची बातमी सांगण्यास नकार दिला होता. कारण जर त्यांना हे कळले असते तर त्या स्वतः सावरू शकल्या नसत्या आणि त्यांनी वाजिदला भेटण्याचा प्रयत्न केला असता. जे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी धोकादायक होते. एवढच नाही तर कुटुंबाच्या इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची भीती होती.' 


वाजिद हे ४२ वर्षांचे होते. वाजिद यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार भावूक होऊन सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहे.

late wajids mother also corona patient read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com