अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ मधून होतोय ‘लव्ह जिहाद’ चा प्रचार ?

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

अक्षयच्या चित्रपटातून‘लव्ह जिहाद’चा प्रचार आणि प्रसार होत असल्याचा आरोप सोशल माध्यमांवर सुरु झाला आहे. त्याला मोठ्य़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी ट्रोलर्सकडून करण्यात येत आहे.  

मुंबई - आपल्याकडे अमुक कुठल्याही एखाद्या कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा अवकाश त्यापूर्वी वाद घडवून आणण्याला जास्त महत्व देण्यात येत आहे. विशेष म्हणजे चित्रपट न पाहता त्यावर बंदी घालण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येते. आता बॉलीवूडचा स्टार अभिनेता याचा लक्षवेधी चित्रपट लक्ष्मी बॉम्ब हा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

अक्षयच्या चित्रपटातून‘लव्ह जिहाद’चा प्रचार आणि प्रसार होत असल्याचा आरोप सोशल माध्यमांवर सुरु झाला आहे. त्याला मोठ्य़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी ट्रोलर्सकडून करण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावरुन कुठलाही वाद होईल याची कल्पना कुणाला नव्हती. आता त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काही प्रेक्षक करत आहेत.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय तर म्हणे या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे. शिवाय चित्रपटात हिंदू-मुस्लिम तरुणांचं प्रेमप्रकरण दाखवून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय अशीही टीका काही प्रेक्षक करत आहेत.

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxmmi Bomb Akshay Kumar Love Jihad connection