
Abhijit Bichukale : महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या; बिचुकलेंनी फुंकलं ठाकरे-शिंदेंविरोधात रणशिंग
राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचे घमासान दिसून येत आहे. अशातच अनेक नेत्यांच्या आणि इतर क्षेत्रातीलही प्रतिक्रिया सातत्याने समोर येत असतात. अशातच आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारंवार चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, "मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं."
"आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. तुम्ही २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या” असं अभिजीत बिचुकले यांनी म्हंटलं आहे.
अभिजीत बिचुकले पुढे म्हणतात की, "जे झालं ते पुरे झालं. शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. 2024 मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या" असं म्हणाले आहेत. अभिजीत बिचुकले यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर पुन्हा एकदा ते ट्रोल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांच्या याचा निर्णयही मेरिट नुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे पुढच्या 3 दिवसांच्या सुनावणीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.