लीना जुमानी बोल्ड अवतारात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

प्रसिद्ध टीव्ही मालिका "कुमकुम भाग्य'मधील रॉकस्टार अभिषेक मेहराच्या मागे असलेली आणि सतत कटकारस्थाने रचणारी तनुश्री म्हणजेच अभिनेत्री लीना जुमानी विक्रम भट्ट यांच्या आगामी "माया 2' या वेबसीरिजमध्ये बोल्ड अवतारात दिसणार आहे.

"माया' ही वेबसीरिज खूपच बोल्ड होती. आता त्याचा दुसरा भाग वेगळी कथा आणि संकल्पना घेऊन येत आहे. दुसऱ्या भागाचे एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्यात सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते लीना जुमानी आणि प्रियल गौर यांच्या किसिंग सीनने. यावरून "माया 2' ही दोन लेसबियन मुलींवर आधारीत कथा असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण "माया'सारखा काय ट्‌विस्ट या मालिकेत येणार हे लवकरच कळेल. सध्या लीना तिच्या या बोल्ड अवतारामुळे जोरदार चर्चेत आहे. "माया 2' 30 मे पासून व्हीबी ऑन वेब या विक्रम भट्ट यांच्या वेब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.

 maya 2 web series

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leena jumani in bold look in maya 2 web series