अनुष्का शर्माला बजावली कायदेशीर नोटीस, वेब सिरीजमध्ये जातीयवादी शिवीचा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

वेबसिरीजमधील एका डायलॉगमध्ये जातीयवादी शिवीच्या कारणामुळे अनुष्काला कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्माची पाताल लोक ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाली. या वेबसिरीजच्या माध्यमातून पहिल्यांदाच अनुष्काने निर्माती म्हणून डिजीटल विश्वात पदार्पण केलं आहे. मात्र या वेबसिरीजमधील एका चुकीच्या गोष्टीमुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या वेबसिरीजमधील एका डायलॉगमध्ये जातीयवादी शिवीच्या कारणामुळे अनुष्काला कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

हे ही वाचा: शक्ती कपूर यांनी पायी प्रवास करणा-या मजुरांच्या वेदना केल्या कवितेततून व्यक्त

गिल्डचे सदस्य आणि प्रणय रॉय एँड असोसिएट्स चेंबर्सशी संबंधित वकिल श्री गुरुंग यांनी अनुष्का शर्माला नोटीस बजावली आहे. गुरुंगच्या म्हणण्यानुसार पाताल लोक वेबसिरीजच्या दुस-या एपिसोडमध्ये एका शब्दाचा उल्लेख केला गेला आहे ज्या शब्दामुळे संपूर्ण नेपाळी समुदायाचा अपमान होत आहे असं त्यांनी म्हटलंय. 

Three Character In Amazon Prime Video New Web Series Paatal Lok ...

जातीयवादी शिवीचा वापर

गुरुंग यांनी म्हटल्याप्रमाणे, एका व्हिडिओ क्लीपमध्ये चौकशी दरम्यान महिला पोलिस अधिका-याने नेपाळी पात्रावर जातीयवादी शिवीचा वापर केला आहे. जर केवळ नेपाळी शब्द उच्चारला असता तर काहीच अडचण नव्हती मात्र यानंतर जो शब्द वापरला आहे त्याला सहमती देऊ शकत नाही. या वेबसिरीजची निर्माती अनुष्का शर्मा असल्याने आम्ही तिला नोटीस पाठवली आहे. अजुनतरी अनुष्काकडून याविषयीची काही प्रतिक्रिया आलेली नाही.

गोरखा समुदाय नाराज

एका मिडिया रिपोर्टनुसार, गोरखा समुदाय देखील सिरीजमधील या डायलॉगमुळे नाराजी दर्शवली आहे आणि हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे.    

legal notice sent to web series producer anushka sharma for casteist slur on a nepali character  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: legal notice sent to web series producer anushka sharma for casteist slur on a nepali character