'वडिलांशी भांडून पुण्याला आले, कँटीनमध्ये नोकरी केली'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

 एका धनाढ्य कुटूंबात जन्माला आलेल्या दिलीप कुमार यांचं जन्मगाव पेशावर. (आताचे पाकिस्तान) त्यांचे मुळ नाव मुहम्मद युसूफ खान

मुंबई - महान अभिनेता होण्यापर्यतचा दिलिप कुमार यांचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना अखंडपणे संघर्ष करावा लागला.त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. अशावेळी एखादा लहान मुलगा आपल्यातील जिद्दीनं मोठा होतो. आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतो. हे सगळं थक्क करणारं आहे. महान अभिनेता दिलिप कुमार 98 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 

* फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे दिलिप कुमार.  चित्रपटात काम करणा-या बहुतांशी अभिनेत्यांनी त्यांच्या सिनेमाची पारायणं केलेली असतात. त्यांच्या कामाचा आदर्श घेतलेला असतो. त्यांचा अभिनय पाहून अभिनेता व्हायचं अशी स्वप्नं पाहिल्यांची संख्या मोठी आहे. 

 Dilip Kumar Facts

 *  अभिनेता नव्हे तर पटकथाकार, लेखक, संवादलेखक, आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख सांगता येईल. वयाची 97 वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती त्यांची पत्नी सायराबानोनं दिली. 

* एका धनाढ्य कुटूंबात जन्माला आलेल्या दिलीप कुमार यांचं जन्मगाव पेशावर. (आताचे पाकिस्तान) त्यांचे मुळ नाव मुहम्मद युसूफ खान. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला. त्यांचे वडिल लाला गुलाम सरवार अली खान हे एक धनाढ्य व्यक्ती होते. त्यांचा फळेविक्रीचा व्यवसाय होता.

*  दिलिप कुमार यांची आई आयशा बेगम ही गृहिणी होती. नाशिक येथील देवळाली येथे दिलिप कुमार याचे शालेय शिक्षण झाले. राज कुमार हे त्यांचे शाळेत असल्यापासूनचे मित्र होते. या दोघांच्या परिवारात  सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध होते.

dilip kumar with Raj Kapoor

*  1940 मध्ये दिलिप कुमार यांनी घर सोडले. याचे कारण म्हणजे वडिलांशी झालेलं भांडण. त्यामुळे ते पुण्याला आले. त्यावेळी ते फार लहान होते. पुण्यात आल्यानंतर ते एका कँफे चालकाला भेटले होते. त्यांनी त्यांना इंग्लिश चांगले येत होते म्हणून कामावर ठेवले होते.

*  दिलिप कुमार यांना इंग्रजी चांगले लिहिता आणि बोलता येत होते. त्यांनी त्यावेळी एका कँटीनमध्ये काम केले. आणि पाच हजार रुपये जमवले. घरी जाण्यासाठी त्यांना हे पैसे उपयोगी पडले.

*  1942 मध्ये दिलिप कुमार यांचे फिल्म इंडस्ट्रीत पाऊल पडले. त्यावेळी त्यांनी डॉ.मेसानी यांची भेट घेतली होती. त्यांनी दिलिप यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. तसेच देविकाराणी यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. त्यावेळी त्या बॉम्बे टॉकीजच्या मालकीण होत्या. 

* स्क्रिप्टरायटर म्हणून सुरुवात करणा-या दिलिप कुमार यांना त्यावेळी पगार होता 1.250 रुपये. उर्दु भाषेवर असणारे त्यांचे प्रभुत्व यासाठी त्यांना अनेक कामे मिळत गेली. त्यांनीही त्या कामाचे सोने केले.

* देविका राणी यांनी त्यांचं नामकरण केले. देविका राणीच्या विनंतीवरुन त्यांनी मोहम्मद युसूफचे नाव दिलिप कुमार असे झाले. त्यांनी त्यांच्या 1944 साली प्रदर्शित केलेल्या ज्वर भट नावाच्या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करण्याची संधी दिली होती.

*  मात्र त्या चित्रपटाला काही फार यश मिळाले नाही. त्यामुळे दिलिप कुमार नाराज झाले होते. 3 वर्षानंतर त्यांच्या जुगनु या चित्रपटाला मोठं यश मिळाले. त्यावेळी त्यांच्या बरोबर नुरजहाँ यांनी काम केले होते. हा चित्रपट 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेला आणि शाहिद चित्रपटांपेक्षा हिट झाला होता. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legendary Actor Dilip Kumar tuns 98 bollywood great actor started his career as a hotel servant