राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कृष्णा कपूर या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास केला.

मुंबई : बॉलिवूड शोमॅन, दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं आज (1 ऑक्टोबर) सकाळी निधन झालं. त्या 87 वर्षाच्या होत्या. 

कृष्णा कपूर या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास केला. कृष्णा कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांनी निधनाची माहिती देत सांगितले की, 'ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आईच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.' राज कपूर आणि कृष्णा मल्होत्रा यांचा विवाह 1946 साली झाला. या दाम्पत्याला रणधीर, ऋषी, राजीव ही तीन मुलं आणि रितू, रिमा या मुली अशी पाच अपत्य आहे. 
करिष्मा कपूर, रणबीर कपूर, करिना कपूर, रिधिमा कपूर ही त्यांची नातवंड आहे. 

krishna raj kapoor

कृष्णा कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर आणि सून यांची मुलगी रिधिमा कपूर हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या आजीचा फोटो शेअर करत लिहीले आहे की, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि नेहमीच राहील. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो, दादी.' 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I love you- I will always love you - RIP dadi

A post shared by Riddhima Kapoor Sahni (@riddhimakapoorsahniofficial) on

krishna raj kapoor

बॉलिवूड कलाकारांनी सोशल मिडीयावरुन कृष्णा राज कपूर यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legendary Actor Raj Kapoors wife Krishna Raj Kapoor passes away