मीना कुमारी यांना गुगलची आदरांजली; 'या' आहेत 'ट्रॅजिडी क्वीन'च्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मीना कुमारी यांची 30 वर्ष सिनेसृष्टीची कारकिर्द राहिली. या कारकिर्दीत 90 पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. मीना कुमारी यांनी दुःखी स्त्री असलेल्या भुमिका अधिक केल्यात. त्यांच्या भुमिकेशी प्रेक्षकही भावनिकरित्या जुळत असत.

'ट्रॅजिडी क्वीन' म्हणून ज्यांची ओळख आहे अशा बॉलिवूडवर राज्य गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांची आज 85 वी जयंती आहे. मीना कुमारी यांचे नाव आजही घेतले की त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाच्या निपुणतेची आठवण होते. अगदी कमी वयात सिनेसृष्टीकडे वळणाऱ्या मीना कुमारी यांचे आयुष्य मात्र फार खडतर प्रवासाप्रमाणे ठरले. 1 ऑगस्ट 1933 ला मुंबईत त्यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करण्यास सुरवात केली. 

meena kumari

मीना कुमारी यांची 30 वर्ष सिनेसृष्टीची कारकिर्द राहिली. या कारकिर्दीत 90 पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. मीना कुमारी यांनी दुःखी स्त्री असलेल्या भुमिका अधिक केल्यात. त्यांच्या भुमिकेशी प्रेक्षकही भावनिकरित्या जुळत असत. त्यामुळे मीना कुमारी यांना 'ट्रॅजिडी क्वीन' या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही फार काही ख्यालीखुशालीचे नव्हते. लहानपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना अनेक दुःखांचा सामना करावा लागला होता. जाणुन घेऊया मीना कुमारी यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपुर्ण गोष्टी....

 • मीना कुमारी यांचे खरे नाव महजबीन बेगम होते. 
 • मीना कुमारी या आई इकबाल बेगम आणि वडिल अली बक्श यांची तिसरी मुलगी होती. त्यांच्या इरशाद आणि मधु नावाच्या दोन मोठ्या बहिणी होत्या.
 • मीना कुमारी यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडिलांकडे डॉक्टरची फी द्यायलाही पैसे नव्हते. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी मीना यांना अनाथआश्रमात सोडून येण्याचा निर्णय घेतला. एका मुस्लिम अनाथआश्रमात त्यांनी मीना यांना सोडलेही, पण आपल्या अपत्याच्या प्रेमापोटी ते मीना यांना काही तासातच परत घेऊन आले.
 • मीना कुमारी यांना शाळेत जायचे होते पण त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणीच सिनेसृष्टीत ढकलले, असे म्हटले जाते.
 • वयाच्या सातव्या वर्षीपासून त्यांनी अभिनय करण्यास सुरवात केली. मीना कुमारी यांचा पहिला चित्रपट 'फरजंद-ए-वतन' हा 1939 साली प्रदर्शित झाला. तर मोठी झाल्यानंतर मीना कुमारी या नावाने त्यांचा पहिला चित्रपट 'वीर घटोत्कच' 1949 मध्ये प्रदर्शित झाला. 
 • 1952 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'बैजू बावरा'ने मीना कुमारी ला अभिनेत्रीची ओळख मिळवून दिली. यानंतर 1953 मध्ये परिणीता, 1955 मध्ये 'आजाद', 1956 मध्ये 'एक ही रास्ता', 1957 मध्ये 'मिस मैरी', 1957 मध्ये 'शारदा', 1960 मध्ये 'कोहिनूर' आणि 1960 मध्ये 'दिल अपना और प्रीत पराई' या चित्रपटांतून त्यांनी बॉलिवूडवर राज्य गाजवले.
 • 1962 साली प्रदर्शित झालेल्या 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटात केलेल्या 'छोटी बहू' या भुमिकेप्रमाणे मीना कुमारी खऱ्या आयुष्यातही मद्यप्राशन करत होत्या. अयशस्वी वैवाहिक जीवन आणि वडिलांसोबत असलेले कमकुवत नाते यामुळे त्या जास्त मद्यप्राशन करायला लागल्या होत्या. 

  meena kumari
   

 • मद्यप्राशनामुळे 1968 मध्ये मीना कुमारी यांची प्रकृती जास्त बिघडली होती. त्यांना उपचारासाठी लंडन आणि स्विर्त्झलँड ला जावे लागले होते. 
 • मीना कुमारी यांचे पहिले पती कमाल अमरोही हे होते. 'पाकीजा' हा चित्रपट कमाल यांचाच होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी 14 वर्ष लागले. 1958 साली चित्रपटाची प्लॅनिंग झाली होती. 1964 साली मीना कुमारी आणि कमाल यांचा घटस्फोट झाल्याने चित्रपटाचे काम थांबले होते. पण 'पाकीजा' 1972 ला प्रदर्शित झाला. 
 • 'पाकीजा' प्रदर्शित होताच चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा खास नव्हता. पण 31 मार्च 1972 ला मीना कुमारी यांच्या निधनानंतर 'पाकीजा' हिट ठरला. 
 • अभिनेत्री बरोबरच मीना कुमारी या उर्दु शायरा पण होत्या. 'आई राइट, आई रिसाइट' या नावाने त्यांनी आपली शायरी रेकॉर्डही केली होती. 
 • मीरा कुमारी यांच्याकडे त्यांच्या शेवटच्या काळात हॉस्पिटलचे पैसे चुकवायला सुध्दा पैसे नव्हते. त्यांचा मृत्यू लिव्हर सोरायसिसने एका नर्सिंग होममध्ये झाला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Legendary Actress Meena Kumari 85 th Birthday