अभिनयात बाप आहेच पण 'रोमान्स' करण्यातही 'कमल' ची बरोबरी नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 7 November 2020

अपयशावर प्रयत्नशील वृत्तीमुळे मात करणारा कमल हसन जसा त्याच्या सशक्त अभिनयासाठी ओळखला जातो तसा त्याच्या 'रोमान्स' ची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली दिसून येते.

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाने मानाचे स्थान मिळवणा-या कमल हसन यांचा बॉलीवूडमध्येही मोठा चाहता वर्ग आहे. या अभिनेत्याला पाहिल्यावर अनेक आपल्या जुन्या काळातील आठवणींनी नॉस्टॅलजिक होणारेही काही कमी नाहीत. कमल हसनचा चित्रपटसृष्टीतील प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. कित्येक ठिकाणी अपमानाला सामोरे जावे लागले आहे.

अपयशावर  प्रयत्नशील वृत्तीमुळे मात करणारा कमल हसन जसा त्याच्या सशक्त अभिनयासाठी ओळखला जातो तसा त्याच्या 'रोमान्स' ची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली दिसून येते.

Kamal Haasan leg implants: Kamal Haasan to undergo leg surgery tomorrow to  remove implant - The Economic Times

7 नोव्हेंबर हा कमल हसन या अभिनेत्याचा जन्मदिवस. यानिमित्ताने त्याला हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने कमल हसन यांचा फॉलोअर्स आहे. त्यांनीही आपल्या आवडत्या कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या औचित्याने त्या चित्रपटविषयक काही वेगवेगळ्या घटनांचा घेतलेला आढावा.

Six reasons why Kamal Haasan is an indisputable mega icon | Hindi Movie  News - Times of India

1. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टींमध्ये कमल हसन यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांचे हिंदीवर प्रभुत्व नसतानाही त्यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव घेतले जाते.  7 नोव्हेंबर 1954 रोजी तामिळनाडूतील परमाकुडी या गावात कमल हसन यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल डॉ. श्रीनिवासन हे एक वकिल होते. कमल हसन यांनी वयाच्या 4 थ्या वर्षापासून अभिनय करायला सुरुवात केली. त्यांना वयाच्या 4 थ्या वर्षी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 3. कमल हसन केवळ अभिनेता म्हणूनच परिचित नसून ते निर्माता, दिग्दर्शक, गायक, पटकथाकार, गीतकार, नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. ते तमिळ, इंग्रजी, तेलगु, हिंदी, मल्याळम, बंगाली, कन्नड आणि फ्रेंच भाषा बोलु शकतात. 

Kamal Haasan home quarantine notice, needling by govt' | The Samikhsya

4. प्रसिध्द अभिनेता असण्याची त्यांची चर्चा होती. त्याबरोबरच कमल हसन हे त्यांच्या अफेयरसाठी प्रसिध्द होते. त्यांची दोन लग्ने झाली असून तीन लिव्ह इन रिलेशनशीप झाली आहेत. त्यांच्या आणि श्री दिव्या अभिनेत्रीविषय़ी नेहमीच चर्चा होत असे. 

Kamal Haasan - Biography, Height & Life Story | Super Stars Bio

5.  1978 मध्ये त्यांनी वाणी गणपती या अभिनेत्री बरोबर विवाह केला. त्यानंतर 10 वर्षांनी घटस्फोट घेतला. या नात्याला घरघर लागण्याचे मुख्य कारण हे त्यांचे अभिनेत्री सारिका हिला डेट करणे हे होते. 

When Vani Ganapathy Lashed Out At Kamal Haasan For Talking About Their  Divorce And Alimony - Filmibeat

6. लग्नाच्या अगोदरच सारिका आई झाली होती. त्यानंतर ते सारिला यांच्याशी विवाहबध्द झाले. सारिकापासून त्यांना श्रृती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. कालांतराने त्यांच्यात काही कारणास्तव खटके उडू लागले. त्यांनी 2004 मध्ये सारिकापासुन घटस्फोट घेतला. 

Throwback: This picture of Shruti Haasan with Kamal and Sarika is  heart-melting!

7. सारिका आणि कमल हसन यांच्यात बेबनाव होण्याचे कारण कमल यांच्या आयुष्यात सिमरन यांचे येणे हे होते. सिमरन बग्गा ही कोणे एकेकाळी कमल हसन यांची सहकलाकार होती. ती त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होती.  

5 Women Kamal Haasan Was In Love With, But Is Alone Today At 63

 8. यानंतर कमल हसन हे अभिनेत्री गौतमी तडीमल्ला यांच्याबरोबर राहायला लागले. गौतमी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द अभिनेत्री होती. आम्हाला आता वेगळे व्हायचं आहे असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. यावर कमल हसने यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Here's a look at Kamal Hassan and Gautami's love story

9. रजनीकांत यांच्या रोबोट चित्रपटासाठी प्रथम प्राधान्य कमल हसन यांना देण्यात आले होते. कमल यांनी आतापर्यत सहापेक्षा अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.  

Rajinikanth: May join hands 'if need arises': Rajinikanth & Kamal Haasan |  Chennai News - Times of India

10. ऑस्करच्या Best Foreign Language Film category मध्ये सर्वाधिक वेळा चित्रपट पाठविण्याचा मान कमल हसन यांच्या नावावर आहे. त्य़ांचे 7 चित्रपट आतापर्यत या कॅटगिरीतून ऑस्करला गेले आहेत. 

PHOTOS: Kamal Haasan with Famous Personalities - Photogallery

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: legendary Performer of Indian Cinema Actor Kamal Haasan birthday