वयाच्या 14 व्या वर्षी बनली अभिनेत्री, सर्वात सुंदर मधुबालाचं प्रेम ठरलं अपयशी

ऋतुजा कदम
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सर्वात सुंदर अशा मधुबाला यांची आज जयंती आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मधुबाला यांनी सिनेमासाठी अर्पित केलं. मधुबाला यांच्या जयंतीविषयी जाणून घ्या त्यांच्याविषयी काही खास गोष्टी !

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनयासोबत महत्त्व आहे ते सौंदर्याला. हातावर मोजण्या इतक्याच काही अशा अभिनेत्री आहेत ज्या सर्वात सुंदर म्हणून ओळखल्या जातात. अभिनयासोबतच सौंदर्यामध्ये सर्वांनाच मागे टाकणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानावर असणारं नाव म्हणजे 'मधुबाला' होय. सर्वात सुंदर अशा मधुबाला यांची आज जयंती आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मधुबाला यांनी सिनेमासाठी अर्पित केलं. मधुबाला यांच्या जयंतीविषयी जाणून घ्या त्यांच्याविषयी काही खास गोष्टी !

Image may contain: 1 person, close-up

अशी होती पर्सनल लाइफ...
सौंदर्याना भुरळ घालणाऱ्या मधुबाला यांची आज 87 वी जयंती आहे. 14 फेब्रुवारी 1933 ला दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला. बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्राच्या मायानगरीत येण्याचं अनेकांच स्वप्न असतं. मधुबाला यांचं संपूर्ण आयुष्य हे केवळ 36 वर्षांचं होतं. पण, हे संपूर्ण आयुष्य त्यांनी कामासाठी म्हणजेच सिनेसृष्टीसाठी दिलं. त्याचं लहानपणीचं नाव मुमताज जहां देहलवी असं होतं. वडिलाचं नाव अताउल्लाह आणि आईचं नाव आयशा बेगम असं होतं. मधुबाला यांचे वडिल तंबाखु बनवणाऱ्या एका कारखान्यात काम करत होते. काही कारणाने त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते दिल्ली व त्यानंतर मुंबईला आले. लहानपणापासूनच मधुबाला यांना सिनेमात काम करायची इच्छा होती. वयाच्या नवव्या वर्षीच सिनेसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे करत त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनात घर केले. आजही मधुबाला यांचं नाव अनेकांच्या ओठावर असतं आणि आजही त्यांचे चाहते कायम आहेत. 

Image may contain: 1 person

Image may contain: 1 person

काला पानी, अमर, चलती का नाम गाडी, तराना, शराबी, मुगल-ए-आजम आणि असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी केले. अभिनय, अदाकारी आणि सौंदर्याने त्यांनी सर्वांनाच घायळ केले. मधुबाला यांना बॉलिवूडची मर्लिन असंही म्हणटलं जायचं. बालकलाकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. 1942 ला 'बसंत' या पहिल्या चित्रपटाने त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात  केली. मधुबाला यांचा अभिनय पाहून त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री देविका रानी खूप इप्रेस झाली. मुमताज जेहान देहलवी हे नाव बदलून 'मधुबाला' हे नाव ठेवण्याचा सल्ला देविका यांनी दिला. मधुबाला यांनी आई-वडिल आणि चार बहिणींसाठी प्रचंड मेहनत घेतली. 1949 सालामध्ये त्यांनी चक्क 9 सिनेमातून काम केलं. त्यामधील एक सिनेमा होता 'महल' ज्यामध्ये अशोक कुमार यांच्यासोबत त्यांनी काम केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि लोकांनी मधुबाला यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. मधुबाला यांनी त्यांच्या करीअरमध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. अभिनेता अशोक कुमार, रहमान, दिलीप कुमार आणि देवानंद सारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. बसंत', 'फुलवारी', 'नील कमल', 'पराई आग', 'अमर प्रेम', 'महल', 'इम्तिहान', 'अपराधी', 'मधुबाला', 'बादल', 'गेटवे ऑफ इंडिया', 'जाली नोट', 'शराबी' आणि 'ज्वाला' असे अनेक सिनेमे केले. 

Image may contain: 1 person

रोमॅंटिक मधुबाला 
व्हॅलेनटाइनच्या दिवशी जन्मलेल्या मधुबाला त्यांच्या आयुष्यातही खूप रोमॅंटिक होत्या. त्यांची प्रेमकथा कोण्या एका सिनेमापेक्षा कमी नाही. मधुबाला आणि दिलिप कुमार यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे.  दिलिप आणि मधुबाला यांची ओळख 1951 मध्ये आलेल्या 'तराना' या सिनेमादरम्यान झाली. पहिल्याच भेटीत या दोघांना प्रेम जडले होते. असंही बोललं मधुबाला यांनी दिलिप कुमार यांच्यासाठी एक गुलाबाचं फुल आणि पत्र पाठवलं होतं. एका सिनेमाप्रमाणेच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. या दोघांची प्रेमकथा सुरुच होती पण, मधुबाला यांच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हते. या नात्याच्या ते विरोधात होते. त्यावेळी अनेक अडचणींना दिलिप आणि मधुबाला यांना सामना करावा लागला. त्यांच्या नात्यामध्ये मोठी अडचण तर तेव्हा आली जेव्हा, दिलिप आणि मधुबाला एका सिनेमाच्या शुटिंगसाठी एकत्र आले. बी.आर. चोपडा यांच्या 'नया दौर' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या. 40 दिवसांचं आउटडोर शुटिंग होतं. पण, मधुबाला यांच्या वडिलांनी त्याला नकार दिला. याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर झालाच पण, मधुबाला यांची तब्येतही बिघडली. 

Image may contain: 2 people

Image may contain: 1 person, indoor

चोपडा यांनी त्यामुळे वैजंतीमाला यांना साइन केले. पण, मधुबाला यांचं कोन्ट्रॅक्ट असताना दुसऱ्या अभिनेत्रीला घेतल्याने हा प्रकार कोर्टात पोहोचला. त्यावेळी दिलिप यांनी दिग्दर्शकांना साथ दिली आणि कोर्टात मधुबाला यांच्या विरोधात विधान दिलं. त्यावेळी मधुबाला यांचा हार्टब्रेक झाला. त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये प्रचंड दरी निर्माण झाली. तरीही त्यांनी मुगल-ए-आजम या सिनेमात एकत्र काम केले. त्यावेळी मात्र अनोळखी व्यक्तीप्रमाणे त्यांनी एकत्र काम केले. या प्रेमाचा अंत झाल्यावर  मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केलं. पण, दुर्देवाने त्यांची तब्येत साथ देत नव्हती. अखेर 23 फेब्रुवारी 1969 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

Image may contain: 1 person


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life story of Beautiful actress madhubala on her birthday