'Liger: Saala Crossbreed’ चा सॉलिड फर्स्ट लूक व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

‘लाइगरः साला क्रॉसब्रीड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. लायगर म्हणजे असा वाघ की जो मिक्स ब्रीड आहे. 

मुंबई -  विजय देवरकोंडाचा अर्जुन रेड्डी आठवला का, त्याच्यावर काही महिन्यांनी कबीर सिंग हा हिंदीत चित्रपट आला होता. त्यात शाहिद कपूरनं प्रमुख भूमिका केली होती. सोशल मीडियावर विजय ट्रेडिंग होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याचा लायगर चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

रागात असणारा विजय आणि त्याच्या जोडीला अनन्या पांडे असा त्या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाले आहे. साऊथमध्ये आपल्या नावानं मोठा चाहतावर्ग तयार करणा-या विजयनं आता बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय़ घेतला आहे. तो लवकरच त्याच्या लायगर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं त्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यानं या चित्रपटातून विजय आणि अनन्या काम करणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती सांगताना त्यानं चित्रपटाचे नावही सांगितले आहे.

‘लाइगरः साला क्रॉसब्रीड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. लायगर म्हणजे असा वाघ की जो मिक्स ब्रीड आहे. जे नर सिंह आणि मादी वाघीण यांच्यातील संबंधातून होतो. या चित्रपटाचे जे पोस्टर रिलिज झाले आहे त्यात विजय हा आक्रमक स्वरुपात दाखविण्यात आला आहे. त्यानं बॉक्सिंग ग्लोव्हज घातले आहेत. त्याच्या मागे अर्धा सिंह आणि अर्धा वाघ यांचे चित्र दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. तर प्रॉडक्शन करण जोहरचं आहे. रविवारी करण जोहरनं यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यावेळी त्यानं चाहत्यांना या नव्या चित्रपटाची माहिती दिली होती. त्यानं असे सांगितले की, या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची प्रमुख भूमिका आहे.

Image

मागील वर्षी अनन्या आणि विजय यांचे चित्रिकरणाच्या वेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी विजयला मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. त्यानं सांगितले होते की, हा चित्रपट धमाकेदार असणार आहे. अद्याप त्याच्या प्रदर्शनाविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही.  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liger: Saala Crossbreed’ first look viral on social media producer Karan johar share picture