'लिपस्टिक..'ला मुहूर्त मिळाला 

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्डाशी झगडत होता. या चित्रपटातील भाषा, यातील दृश्‍ये अत्यंत असभ्य असून या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याची भूमिका बोर्डाने घेतली होती.

याविरोधात या चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा सातत्याने लढा देत होते. त्याला अखेर यश आले असून हा चित्रपट 28 जुलैला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट वितरीत करण्यासाठी एकता कपूर पुढे आली आहे. 
या चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय महोत्सवात लौकीक मिळवण्यास सुरुवात केली आहे. अलंकृता श्रीवास्तव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात कोंकणा सेन शर्मा, वैभव तत्ववादी यांच्या भूमिका आहेत. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर हा चित्रपट भाष्य करतो. 

Web Title: lipstic under my burka release esakal ent news