दुसऱ्यांदा आई होणार 'ही' बॉलीवूड अभिनेत्री; पाहा फोटो

वृत्तसंस्था
Sunday, 18 August 2019

बॉलिवूड स्टार आणि मॉडेल लीसा हेडन दुसऱ्यांदा आई होणार आहे. लीसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये आता आम्ही तीन नाही तर चारजण पार्टी करणार अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मुंबई : बॉलिवूड स्टार आणि मॉडेल लीसा हेडन दुसऱ्यांदा आई होणार आहे. लीसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये आता आम्ही तीन नाही तर चारजण पार्टी करणार अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

लिसाने शेअर केलेल्या फोटोत लीसा तिचा पती डिनो ललवानी आणि मुलगा जॅकसोबत दिसते आहे. या फोटोत तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे. क्वीन आणि  शौकीन  सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंर 2016मध्ये लिसा डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Party of four on the way 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

पहिल्या मुलासोबतचे फोटो लिसा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आता लीसा दुस-यांदा आई होणार आहे. लिसाने ही बातमी सर्वांना सांगितल्यानंर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Image result for lisa haydon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lisa Haydon announces second pregnancy with a beautiful family picture