#WorldDrugDay : हे आहेत ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडलेले बॉलिवूड स्टार्स

टीम ईसकाळ
Wednesday, 26 June 2019

बॉलिवूड आणि ड्रग्ज हे कनेक्शन वर्षानुवर्षे जगजाहीर आहे. अनेक कलाकार विविध कारणांनी ड्रग्जच्या आहारी गेले आणि त्यातून यशस्वीपणे बाहेरही आले. त्यांचा घेतलेला हा आढावा.

#WorldDrugDay : आज 26 जून, 'World Drugs Day'! बॉलिवूड आणि ड्रग्ज हे कनेक्शन वर्षानुवर्षे जगजाहीर आहे. अनेक कलाकार विविध कारणांनी ड्रग्जच्या आहारी गेले आणि त्यातून यशस्वीपणे बाहेरही आले. या कलाकारांनी ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी अनेक उपाय केले. ड्रग्जपासून बडे बडे दिग्गजही सुटलेले नाहीत. कोणकोणते कलाकार ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडले? जाणून घ्या...

रणबीर कपूर, अभिनेता
यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचलेला आणि तरूणींचा आवडता चॉकलेट बॉय रणबीर कपूर हा ही ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता. फिल्मिंग स्कूलमध्ये असल्यापासून रणबीर वीडचे सेवन करत होता. हे त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते. 

ranbeer

संजय दत्त, अभिनेता 
संजय दत्तच्या 'संजू' या बायोपिकवरून आपल्याला समजलेच असेल की, संजय दत्त अमली पदार्थांच्या किती आहारी गेला होता. 'जगात असे कोणतंच ड्रग्ज नाही जे मी घेतलं नाही. माझ्या वडिलांनी मी ड्रग्जमधून बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न केले. कालांतराने माझ्या शरीरावर याचे वाईट परिणाम दिसू लागले. मला व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवले गेले, तिथूनही मी पळून आलो. पण नंतर माझं मलाच जाणवलं की, यातून बाहेर यायला हवे व त्यासाठी मी प्रयत्न केले,' असे संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले. 

 sanjay dutt

प्रतीक बब्बर, अभिनेता
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बर हा ही ड्रग्जच्या विळख्यात सापडला होता. लहानपणापासूनच लागलेल्या ड्रग्ज सेवनाच्या सवयीचा त्याच्या आयुष्यावर प्रचंड मोठा परिणाम झाला. यातून बाहे पडणे अत्यंत आवश्यक होते, त्याप्रमाणे तो त्यातून बाहेर पडला. 

prateik babbar

धर्मेंद्र, ज्येष्ठ अभिनेते 
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे ही अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलेले नाही. जेव्हा त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती, त्यावेळी त्यांचे दारूचे व्यसन वाढले होते, असे त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितले होते.  

 dharmendra

महेश भट, दिग्दर्शक
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांनी एका विशेष कारणामुळे अमली पदार्थांचे सेवन बंद केले. त्यांची मुलगी शाहीन ही त्यांना दारूच्या वासामुळे टाळत होती. यामुळे केवळ मुलीसाठी त्यांनी हे व्यसन सोडले. 

 mahesh bhatt

मनिषा कोईराला, अभिनेत्री
कर्करोगाशी झगडणारी अभिनेत्री मनिषा कोईरालाही ड्रग्जचे व्यसन होते. पण कर्करोगाचे निदान झाल्यनंतर अपोआपच हे व्यसन बंद झाले. 

manisha koirala

सुझेन खान, फॅशन डिझायनरर
हृतिक रोशची पत्नी सुझेन खान ही त्यांच्या घटस्फोटानंतर प्रचंड प्रमाणात ड्रग्जच्या आहारी गेली होती. आपले दुःख व ताण दूर करण्यासाठी तिने ड्रग्जला जवळ केले होते.

Image result for sussanne khan

फरदीन खान, अभिनेता 
गेले काही दिवस बॉलिवूडपासून दूर असलेला अभिनेता फरदीन खान हा ही ड्रग्जच्या जाळ्यात अडकला होता. 'मी मधल्या काही काळात ड्रग्जवर प्ररचंड अवलंबून होतो. ड्रग्जशिवाय माझा दिवसच जात नसे. जेव्हा एखादा ताण मोठ्या प्रमाणात आपल्या मनावर येतो, तेव्हा माणूस सहजपणे ड्रग्जच्या आहारी जातो. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी माझ्या कुटूंबाने मला खूप मदत केली. त्यांच्यामुळेच आज मी यातून बाहे पडू शकलो,' असे फरदीनने सांगितले.

हनी सिंग, गायक 
प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंग हा ही ड्रग्जचे मोठ्या प्रमाणात सेवन करायचा. 'चा बॉटल व्होडका, काम मेरा रोज का' हे गाणे काही बाबतीत त्याच्याबद्दल खरे होते. त्याचे करिअरला जेव्हा उतरती कळा लागली, तेव्हा त्याने ड्रग्ज घ्यायला सुरवात केली.   

honey singh

संयुक्त राष्ट्रांनी 26 जून हा जागतिक 'अमली पदार्थ विरोधी दिन' म्हणून 1988 रोजी सुरू केला. या दिवशी विविध संस्था अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जागरूकत निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: List of Bollywood stars who successfully fought against drugs addiction